बॉलिवूड कलाकारांना प्रत्येक चित्रपटात किसिंग, रोमँटिक किंवा इंटिमेट सीन्स हे द्यावेच लागतात. पण कधीकधी कलाकारांना असे सीन शूट करणे कठीण होते. असेच काहीसे दिव्या खोसला कुमार आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत घडले होते. स्वत: दिव्याने एका शोमध्ये याबाबत खुलासा केला आहे.
‘सत्यमेव जयते २’मध्ये जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला यांनी एक रोमँटिक साँग शूट केले होते. एकदा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये याबाबत दिव्याने खुलासा केला होता. कपिलने दिव्याला पती भूषण कुमार समोर असताना जॉनसोबत रोमँटिक साँग शूट करताना कसे वाटत होते असा प्रश्न विचारला होता.
आणखी वाचा : Kissing सीनदरम्यान कट म्हटल्यानंतरही ‘या’ अभिनेत्री स्वत:ला थांबवू शकल्या नाहीत, पाचवे नाव वाचून बसेल धक्का
‘भूषण कुमार हे सेटवर जास्त कधी येत नाहीत. पण सत्यमेव जयते २ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना २ ते ३ दिवस आले होते. मला काही वाटले नाही. मी कम्फर्टेबल होते’ असे दिव्या खोसला कुमार म्हणाली.
जेव्हा भूषण कुमार सेटवर आले तेव्हा ती रोमँटिक गाण्याचे चित्रीकरण करत असल्याचे तिने सांगितले. त्यांना देखील काही वाटले नाही. उलट सीन शूट करताना पाहून त्यांना हसू अनावर झाले होते असे दिव्याने म्हटले. दिव्याने पती भूषण कुमारची प्रतिक्रिया सांगितल्यानंतर सर्वांना हसू अनावर झाले होते.