अभिनेत्री दिव्या खोसला कुमार तिच्या सौदर्यामुळे कायमच चर्चेत असते. दिव्याने बॉलिवू़डमधील काही सिनेमांमध्ये काम केलंय. तर काही सिनेमाची निर्मिती केली आहे. तसचं ‘याद पिया की आने लगी’ आणि त्यानंतर आलेल्या ‘तेरी आखों मे’ या अल्बममुळे ती अधिक लोकप्रिय झाली. दिव्या सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. दिव्या खोसलाने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमुळे मात्र नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केलंय.
दिव्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने डेनिम शॉर्टस् आणि मल्टिकलर क्रॉप टॉप परिधान केल्याचं दिसतंय. “जेव्हा मी कसाटा आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर निघते” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय. मात्र या फोटोतील दिव्याचा मेकअप पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केलं आहे. या फोटोंमध्ये दिव्याचे गाल खूपच लालबुंद दिसत असल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. दिव्याचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
कतरिना कैफने विकी कौशलच्या भावाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
एक नेटकरी म्हणाला, “एवढ्या पिंपल”, दुसरा नेटकरी म्हणाला, “मेकअप चुकला”, तर आणखी एक युजर म्हणाला, “तुझे गाल माकडासारखे खूप लाल दिसतायत” तर एका नेटकऱ्यांने कमेंट करत म्हंटलं, “मेकअपचा डब्बा”
दिव्याच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलंय. याआधी देखील दिव्याला अनेकदा ट्रोल करण्यात आलं.
२००४ मध्ये दिव्याने ‘लव टुडे’ या चित्रपटातून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर फाल्गुनी पाठकच्या अय्यो रामा या गाण्यातही ती दिसली होती. त्यानंतर तिला अक्षय कुमार आणि बॉबी देओल यांच्या सोबत ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ या चित्रपटात अभिनय साकारण्याची संधी मिळाली.याच चित्रपटादरम्यान तिची भेट भूषण कुमारसोबत झाली. २०१९ मध्ये दिव्या तिच्या ‘याद पिया की आगे लगे’ या गाण्यामुळे पुन्हा चर्चेत आली होती. हे गाणं नेहा कक्कडनं गायलं होतं.