‘दिया और बाती हम’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘संध्या’ म्हणजेच दीपिका सिंगने मागील महिन्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर मुलाचा फोटो पाहण्यासाठी तिचे चाहते फार उत्सुक होते. चाहत्यांची हीच उत्सुकता पाहता दीपिकाने नुकताच आपल्या मुलाचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर या फोटोवर खूप लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्या मुलाचा फोटो शेअर करत दीपिकाने आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. दीपिकाचा मुलगा आता एक महिन्याचा झाला आहे. २०१४ मध्ये तिने ‘दिया और बाती हम’ या मालिकेचा दिग्दर्शक रोहित राज गोयलसोबत लग्न केलं. रोहित राज गोयलनेच त्यांच्या बाळाच्या आगमनाची बातमी माध्यमांना दिली होती. या गोड बातमीनंतर दीपिकाच्या चाहत्यांना त्यांच्या लाडक्या अभिनेत्रीच्या बाळाचे फोटो पाहण्याची उत्सुकता लागली होती.

वाचा : ‘कोणत्याही मुलीला कीस केल्यास तर मी तुझे ओठ चिरेन’ 

गरोदर असतान दीपिकाने तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. ती म्हणालेली की, ‘मी सुट्टीसाठी बाहेरगावी गेले होते तेव्हा मी आजारी पडले. तेथून परतल्यानंतर लगेच मी डॉक्टरांची भेट घेतली. तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला या गोड बातमीबद्दल सांगितले. माझे आई-वडील, सासू-सासरे आणि नवरा हे यामुळे खूप आनंदी आहेत. बाळाला जन्म देणं हा प्रत्येक स्त्रीसाठी एक सुंदर अनुभव असतो. माझे कुटुंब काही गोष्टींमध्ये अंधश्रद्धाळू असल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस आम्ही ही बातमी कोणालाच सांगितली नाही. मी त्यांच्या भावना समजू शकते. रोहित आणि मी आतुरतेने त्या क्षणाची वाट पाहत आहोत.’