अभिनेत्री दिया मिर्झा सध्या गरोदर असून हा काळ ती एन्जॉय करतेय. 2001 सालात आलेल्या ‘रेहना है तेरे दिल में’ या सिनेमातून दियाने बॉलिवूड विश्वात पदार्पण केलं. दियाच्या करिअरमध्ये अनेक चढउतार आले. मात्र समाजकार्य आणि विविध वक्तव्यांमुळे दिया कायम चर्चेत राहिली. नुकत्याच ब्रुट इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत दियाने बॉलिवूडमधील लैगिंक भेदभावाचा खुलासा केला आहे. सुरवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये लैंगिक भेदभाव केला जात असल्याचं ती म्हणाली आहे.
या मुलाखतीत ती म्हणाली, “लोक लिहत होते, विचार करत होते आणि सेक्सिस्ट सिनेमा बनवत होते आणि मी त्याचा एक भाग होते. “असं ती म्हणाली. उदाहरण देत ती म्हणाली, ” त्या काळात मेकअप आर्टिस्ट हा पुरुषच असला पाहिजे आणि हेअर ड्रेसरचं काम एक महिलाच करू शकते असं होतं”
याच सोबत पुढे ती म्हणाली, “ज्यावेळी मी सिनेमांमध्ये काम करायला सुरूवात केली. त्यावेळी सेटवर जवळपास 120 क्रू मेंबर असायचे ज्यात मुश्किलीने ४ ते ५ महिला असायच्या. आपण पितृसत्ताक समाजात राहतो आणि या इंडस्ट्रीमध्ये पुरुष नेतृत्व करतात. त्यामुळे इथे सर्रासपणे लैंगिक भेदभाव केला जातो. इथे अनेक असे पुरूष आहेत जे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आहेत ज्यांना कल्पनाही नसेल की ते लैंगिक भेद करत आहेत. त्यांना आपण असे विचार करतो याची कल्पनाही नसेल.” असं म्हणत दियाने बॉलिवूडमधील लैंगिक भेदभावावर खुलासा केला.
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली,”मला खात्री आहे की गोष्टी आता सुधारल्या आहेत. कारण पितृसत्ता म्हणजे काय आणि लैंगिक भेदभाव म्हणजे काय? याबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण झालीय.” असं ती म्हणाली.
15 फेब्रुवारीला दिया मिर्झाने व्यवसायिक वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर १ एप्रिलला दियाने ती आई होणार असल्याची बातमी सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली. यावरून दियाला ट्रोलही करण्यात आलं होतं.