बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सुष्मिता गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. सुष्मिता आणि बॉयफ्रेंड रोहमन शॉलचा नुकताच ब्रेकअप झाला आहे. सुष्मिता स्वतःच्या अटींवर आयुष्य जगण्यासाठी ओळखली जाते. सुष्मिताला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र राहायला आवडते. सुष्मिता तिच्या आयुष्याचे निर्णय विचारपूर्वक घेते. तर कधी विश्व सुंदरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुष्मिताची किती संपत्ती आहे हे जाणून घेण्याची इच्छा तिच्या चाहत्यांना लागली आहे. तर आज आपण तिच्या संपत्ती विषयी जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुष्मिताने फक्त मोठ्या पडद्यावरच नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सुष्मिताची ७४ कोटींची संपत्ती आहे. तर २०२१ च्या आकडेवारीनुसार, सुष्मिताची एका महिन्याला जवळपास ६० लाख रुपयांची कमाई जवळपास आहे. सुष्मिता एका चित्रपटासाठी जवळपास ३ ते ४ कोटी रुपये घेते. त्यासोबतच मॉडेलिंगचे अनेक प्रोजेक्ट्स ती करते.

आणखी वाचा : “अशिक्षित आणि…”, सुधीर मुनगंटीवारांबाबत सोनम कपूरची पोस्ट व्हायरल!

आणखी वाचा : ‘माझी परफेक्ट वाईफ’, रितेशने शेअर केला जिनिलियाचा हा मजेशीर व्हिडीओ

या व्यतिरिक्त ब्रँडचे प्रमोशन करण्यासाठी तिला चांगलीच रक्कम दिली जाते. सुष्मिता जाहिरातीत काम करत दीड कोटी रुपयांची कमाई करते. २०२१ मध्ये तिच्या संपत्तीत वाढ झाली आहे. दरम्यान, १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या दस्तक या चित्रपटातून सुष्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुष्मिताचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत. सुष्मिताची आर्या ही वेब सीरिज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know the net worth of actress and model sushmita sen dcp