सिद्धहस्त लेखक अशी ओळख असलेले आणि चिमटे काढत आपल्या खास कणेकरी शैलीत साहित्य निर्मिती करणारे लेखक शिरीष कणेकर यांचं निधन झालं आहे. विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन त्यांनी केलं होतं. क्रिकेट, सिनेमा आणि राजकारण हे त्यांच्या आवडीचे विषय होते. विविध इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्र तसंच साप्ताहिकांमध्ये त्यांनी विपुल लेखन केलं आहे. त्यांची किस्से सांगण्याची शैलीही अनोखी होती. जे किस्से अजूनही लोकांच्या लक्षात आहेत. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याविषयीचा एक किस्सा कणेकरांनी सांगितला होता. तो किस्सा काय होता माहित आहे का?

काय आहे नमक हराम सिनेमाचा तो किस्सा?

“नमक हराम हा सिनेमा जेव्हा आला तेव्हा राजेश खन्नाला अमिताभची भूमिका करायची होती. हृषिकेश मुखर्जींनी त्याची समजूत घातली आणि त्याला सांगितलं की तुला जी दिली आहे ती भूमिकाच तू कर. अमिताभला अमिताभची भूमिका करु दे. त्याने हृषिकेश मुखर्जींचं ऐकलं. सिनेमा रिलिजच्या आधी प्रीमियर होता. तो राजेश खन्नाने सांगितला. मला राजेशच्या तोंडून तो किस्सा ऐकून अंगावर काटा आला होता. कारण राजेश म्हणाला मी सिनेमा पाहून आलो आणि मनाशी म्हणालो अरे यार दुसरा सुपरस्टार पैदा हो गया! एक अख्खं संस्थान बरखास्त होतंय हे त्याच्याच तोंडून ऐकताना माझ्या अंगावर काटा आला होता.”

anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Exploding notes in Anand Ashram Dighe confidant Nandkumar Gorule was enraged
आनंद आश्रमात नोटांची उधळण, दिघे साहेबांचे विश्वासू नंदू गोरूले संतापले, म्हणाले…
Yograj Singh Shares Incident of His Father Said My Father Killed a Tiger Smeared its blood on my lips and Forehead
Yograj Singh: “माझ्या वडिलांनी वाघाची शिकार करून रक्त माझ्या ओठाला लावलं…”, युवीच्या बाबांनी सांगितला धक्कादायक किस्सा
Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
grandchildren of Nitin Gadkari did sthapna of Pancharatna Bappa
नातवांनी मांडला गणपती, कौतुकाला आले गडकरी आजोबा…..एकाच घरात दोन….
kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
Amol Mitkari Post That Photo
Shivaji Maharaj Statue : महायुतीत बेबनाव? देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींनी पोस्ट केला शिवरायांचा फोटो, म्हणाले..

राजेश खन्नाला हेच वाटू लागलं होतं की तो देव आहे

राजेश खन्ना हा एकेकाळी सुपरस्टार गाजवलेला माणूस. मी एकदा त्याला विचारलं होतं तुम्हाला नॉर्मल आयुष्य आता जगता येईल का? त्यावेळी मला त्याने प्रामाणिक उत्तर दिलं होतं अजिबात नाही. मी विचारलं होतं का? तर त्यावर मला राजेश म्हणाला अरे वयाच्या २३ व्या की २४ व्या वर्षी मला वाटायला लागलं होतं की देव मीच आहे. कारण सकाळी घराचं दार उघडलं की निर्माते, दिग्दर्शक, साईड हिरो, हिरॉईन्स पायाशी लोटांगण घालायचे आम्हाला चान्स द्या म्हणून. २३ व्या वर्षी जर हे झालं तर देव मीच आहे हे वाटणार नाही? त्यामुळे नॉर्मल आयुष्य जगणं आता शक्य नाही असं त्याने मला सांगितलं होतं.

आनंद या सिनेमात अमिताभ आणि राजेश खन्ना पहिल्यांदा एकत्र आले होते. या सिनेमात राजेश खन्नाचा अभिनय इतका भन्नाट होता की त्यापुढे अमिताभ काहीसा झाकोळला गेला. मात्र नमक हराम हा सिनेमा आला त्यात अमिताभने जो अभिनय केला त्यापुढे राजेश खन्नाला हे जाणवलं की पुढचा सुपरस्टार अमिताभ आहे. तेच त्याने शिरीष कणेकर यांना सांगितलं होतं. हा किस्सा आजही लोकांच्या स्मरणात आहे.