चित्रपटविश्व म्हंटलं की आपल्यासमोर मोठमोठे सेलिब्रिटीज, स्टार मंडळी आणि त्यांची आरामदायी, स्टायलीश लाईफस्टाइल याच गोष्टी येतात. खासकरून आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत अभिनेते आणि अभिनेत्री यांनाच प्रचंड महत्त्व दिलं जातं. वास्तविक पाहता त्यांच्याही आधी एखाद्या चित्रपटाशी सर्वात जास्त जोडलेला असतो तो म्हणजे लेखक. चित्रपटाची कथा लिहिणाऱ्या लेखकांना म्हणावं तितकं महत्त्व आणि मानधन मिळत नसल्याची तक्रार आपण बऱ्याचदा ऐकली आहे.
गुलजार, जावेद अख्तर, सलीम खान यासारख्या काही लेखकांनी या क्षेत्रात क्रांति आणली खरी, पण आजही आपल्या चित्रपटविश्वात लेखकांना फार महत्त्व नाही हे अगदी खरं आहे, पण आजच्या काळात एक असा लेखक आहे जो या एका स्टारप्रमाणेच रग्गड मानधन घेतो. आज आपण भारतातल्या सर्वात महागड्या चित्रपट लेखकाबद्दल जाणून घेणार आहोत.
आणखी वाचा : ‘या’ कारणामुळे बरीच वर्षं शाहरुख खान काश्मीरला गेला नाही; किंग खानचा जुना व्हिडीओ चर्चेत
‘डीएनए न्यूज’च्या व्ही विजयेंद्र प्रसाद म्हणजेच दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे वडील हे सध्या भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारे चित्रपट लेखक आहेत. विजयेंद्र प्रसाद हे एक दोन नव्हे तर तब्बल ५ कोटी इतकं मानधन घेणारे ८१ वर्षांचे पहिले लेखक आहेत, आणि प्रत्येक चित्रपटाच्या यशाबरोबरच त्यांनी त्यांचं मानधन वाढवलं आहे.
विजयेंद्र प्रसाद यांनी एसएस राजामौली यांच्यासाठी ‘मगधीरा’, ‘आरआरआर’, ‘बाहुबली’सारखे सुपरहीट चित्रपट लिहिलेच. शिवाय बॉलिवूडमध्येही त्यांनी ‘बजरंगी भाईजान’, ‘रावडी राठोड’, ‘मणीकर्णिका’सारखे हिट चित्रपट दिले. विजयेंद्र प्रसाद यांच्याआधी अभिजात जोशी हे सर्वाधिल मानधन घेणारे लेखक होते जे एका चित्रपटासाठी ३ कोटी रुपये घेत असत. विजयेंद्र प्रसाद हे सध्या सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’च्या पुढील भागासाठी लिखाण करत असल्याची चर्चा होत आहे.