बॉलीवूड बादशाहाला क्रिकेटचे खूप वेड आहे. त्याचे हे वेड आयपीएलमधील कोलकाता नाइट राइडर्स (केकेआर) या संघामुळे सगळ्यांनाच कळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या या टीमवर माहितीपट (डॉक्यूमेन्टरी फिल्म) बनविण्यात येणार आहे.
कोलकाता नाइट रायडर्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसोर यांनी याबात माहिती दिली. या माहितीपटाचे काम पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. संघाची आतापर्यंतची वाटचाल या माहितीपटातून उलगडण्यात येणार आहे. कूल असे संघ गीत आणि हॉट चिअरलीडर्ससह माहितीपट बनविण्यात येणारा कोलकाता नाइट राइडर हा पहिलाच संघ असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा