छोट्या पडद्यावर सध्या ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधरने घराघरात ‘पाठकबाईं’च्या नावाने ओळख निर्माण केली.‘का रे दुरावा’ मालिका फेम सुयश टिळक आणि अक्षया यांच्या लव्हस्टोरीची सध्या चांगलीच चर्चा आहे. सुयशने त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो पोस्ट केला असून त्याचीच चर्चा पाहायला मिळतेय.

https://www.instagram.com/p/BdZeq5YFuhw/

सोशल मीडियावर सक्रिय असणारा प्रत्येक जण आज आयुष्यातील अनेक क्षण इन्स्टाग्राम किंवा फेसबुकच्या माध्यमातून शेअर करत असतो. बॉलिवूड कलाकारांप्रमाणे मराठी कलाकारही आता सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. सुयश आणि अक्षयासुद्धा यामध्ये मागे नाहीत. इन्स्टाग्रामवर दोघेही बऱ्याचदा एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असताना पाहायला मिळतात. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सुयशने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. मात्र, यामध्ये लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे अक्षयाच्या हातातली अंगठी. तिच्या हातातील हिऱ्याची मोठी अंगठी पाहून दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याची जोरदार चर्चा आहे. नवीन वर्षात त्यांनी आपल्या नात्याला एक पाऊल पुढं नेण्याचा विचार करत साखरपुडा केला की काय, असं म्हटलं जात आहे. यावर आता अक्षया आणि सुयश काय म्हणणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

https://www.instagram.com/p/BdPtr13DqOo/

Story img Loader