दिवाळीत प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत कन्नड चित्रपट ‘कांतारा’ने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. हा चित्रपट मूळ कन्नड भाषेत आहे मात्र आता तो भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. देशातच नव्हे तर परदेशातदेखील या चित्रपटाची चर्चा आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात २४३ कोटी रुपये कमाई केली आहे. चित्रपट समीक्षकांसह कलाक्षेत्रामधील अनेक दिग्गज मंडळींनी या चित्रपटाचं कौतुक केलं. ‘कांतारा’ला मिळालेलं यश पाहता रिषभच्या कामाचं दिग्गज अभिनेत्यांनी कौतुक केलं आहे.
या चित्रपटाचे जसे कौतुक होत आहे तशीच या चित्रपटावर टीकादेखील होत आहे. हा चित्रपट अंधश्रद्धेला खतपाणी घालतो आहे असा आरोप केला जात आहे. यावर चित्रपटाचा सर्वेसर्वा रिषभ शेट्टी ईटाईम्सशी बोलताना असं म्हणाला की, “मी जे पाहिले आणि ज्यावर माझा विश्वास आहे ते मी मांडले आहे. देवाचा संदेश हा निसर्ग आणि माणूस यांच्यातील सेतूसारखा आहे असे मी मानतो. निसर्गापुढे सगळे सारखे हाच संदेश चित्रपटात दिला आहे. आम्हाला चित्रपटातून सकारात्मकता पसरवायची होती. आम्हाला कोणाला दुखवायचे नव्हते. जर कोणी याला अंधश्रद्धा म्हणत असेल तर मी त्याबद्दल काहीही करू शकत नाही”. अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
विराटच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अर्जुन कपूरने केली कमेंट; नेटकरी म्हणाले, “तुला…”
हा चित्रपट कर्नाटकातील एका लोककलेवर आणि तिथल्या अनुसूचित वर्गाच्या रूढी परंपरा यांच्यावर आधारित आहे. गावातील जमीनदार वर्गाची मक्तेदारी आणि त्यांनी केलेला अन्याय या गोष्टीलासुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
रिषभने लेखक, दिग्दर्शन, अभिनय अशा तिन्ही गोष्टी सांभाळल्या आहेत. रिषभने आपल्या करियरची सुरवात त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली आहे. रिषभने काही काळ बॉलिवूडमध्ये छोटी मोठी काम केली आहेत मात्र त्याला यश मिळाले नाही. रिषभने २००६ आलेल्या ‘सायनाईड’ या कन्नड चित्रपटात काम केले होते.