डॉली अहलुवालियाने जरी आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरूवात शेखर कपूरच्या ‘बॅन्डिट क्वीन’द्वारे केली नसली, तरी आजही या चित्रपटाचे नाव ऐकताच ती गतकाळच्या आठवणींमध्ये रमून जाते. डॉलीला या चित्रपटासाठी पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याच्या आधी डॉली एक प्रस्थापित वेशभूषाकार होती. डाकू ते नेता असा प्रवास केलेल्या फूलन देवीच्या जीवनावर आधारीत ‘बॅन्डिट क्वीन’ या चित्रपटासाठी डॉलीने वेशभूषाकार म्हणून काम पाहिले होते. वेशभूषाकार म्हणून डॉलीचा हा पहिलाच चित्रपट  होता.
तिने दुसरा राष्ट्रीय पुरस्कार ‘विकी डोनर’ चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सह-अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी पटकावला. आता डॉली तिच्या वेशभूषाकाराच्या व्यवसायाकडे वळालीये. फरहान अख्तरच्या ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाचे कॉशच्यूम डिझाईन डॉलीने केले आहे.
शेखर कपूर आणि मनोज वाजपेयी तुम्ही दोघेजण जेव्हा बॅन्डिट क्वीन चित्रपटाचा उल्लेख करता, तेव्हा मी गतकाळच्या आठवणींमध्ये रमून जाते. माझ्या वेशभूषाकाराच्या करिअरची ती सुरूवात असल्याचे डॉलीने ट्विट केले.