दिवसेंदिवस मलायका-अरबाजच्या घटस्फोटाच्या चर्चेला अधिक उधाण येत चालले आहे. याबाबत अद्याप या दोघांनाही उघडपणे कोणतेही वक्तव्य केलेली नाही. दरम्यान, अरबाजचे वडिल सलीम खान यांनीदेखील त्या दोघांच्या नात्यावर बोलण्यास नकार दिला आहे.
मला माझ्या मुलांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करायला आवडत नाही, असे सलीम खान यांनी म्हटले आहे. मी एक लेखक आहे. मला कोणाच्याही प्रेमसंबंध किंवा ब्रेकअपबद्दल विचारू नका. माझ्या मुलांच्या आयुष्यात मी हस्तक्षेप करत नाही आणि मला त्याविषयी बोलायचेदेखील नाही, असे सलीम पीटीआयशी बोलताना म्हणाले. मलायकाची आई जॉयस पॉलीकार्प यांनीदेखील याबाबत बोलण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या की, मलायका आणि अरबाज या दोघांना योग्य ते ज्ञान आहे. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे आणि मला त्यात पडायचे नाही. मला याविषयी माध्यमांशी काहीही बोलण्याची इच्छा नाही.
मलायका-अरबाजच्या लग्नाला १८ वर्षे झाली असून त्यांना १३ वर्षाचा अरहान हा मुलगादेखील आहे.

Story img Loader