बॉलिवूडच्या यावर्षीच्या ‘बिझी’ कलावंतांमध्ये जॉन अब्राहमचाही नंबर आहे. त्याचा ‘आय मी और हम’ यंदा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट. एकूणच २०१३ चे कॅलेंडर जॉन अब्राहमसाठी भरगच्च भरलेले आहे. म्हणूनच ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’च्या यादीत सलमान खाननंतर जॉनचा क्रमांक लागतो. परंतु जॉन अब्राहम म्हणतोय लग्न करायला वेळ कुठाय? निदान यंदा तरी नक्कीच नाही.
‘बिप्स’ अर्थात बिपाशा बासूसोबत अनेक चित्रपट आणि अनेक वर्षे नाव जोडले गेल्यानंतर ते दोघे विवाहबद्ध होतील अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, सध्या जॉन अब्राहमचे नाव गाजतेय ते इन्व्हेस्टमेंट बँकर प्रिया रुंचाल हिच्यासोबत. त्यामुळेच अलीकडेच एका कार्यक्रमात त्याला विवाहाबाबत छेडण्यात आले. तेव्हा त्याने विवाह २०१३ मध्ये तरी शक्य नाही. या वर्षांत प्रदर्शित होणाऱ्या अनेक चित्रपटांच्या कामात आपण प्रचंड व्यस्त आहोत, असे त्याने सांगून टाकले.
जॉनचे यावर्षी ‘दोस्ताना – २’, ‘शूटआऊट अॅट वडाळा’, ‘मद्रास कॅफे’, ‘आसमान’, ‘इस प्यार को क्या नाम दू’, ‘चेनाब गांधी’, ‘फिल्लम सिटी’, ‘हॅपी बर्थडे’ यांसारखे अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे लग्न करायला वेळ कुठाय असे म्हणणारा जॉन सध्या तरी प्रिया रूंचालसोबत ‘डेटिंग’ करण्यात ‘बिझी’ राहणेच पसंत करतोय म्हणे!

Story img Loader