यावर्षी मी दिवाळीसाठी काहीचं प्लॅन करु शकले नाही. ‘का रे दुरावा’च्या शूटींगमध्ये व्यस्त असल्यामुळे मला दिवाळीसाठी काही खास करण जमलेलं नाही. दोन तीन दिवस मी सुट्टी तर घेतली आहे पण त्यातही मला झी च्या कार्यक्रमाला जावं लागणार आहे. मात्र, भाऊबीजेदिवशी काहीही झालं तरी मी वेळ काढून माझ्या घरच्यांसोबत दिवाळी सेलिब्रेट करणार आहे.
मला खरंतर फराळ बनवायला खूप आवडतो पण यंदा कामामुळे आईला मदत करू शकले नाही. पर्यावरस्नेही दिवाळी साजरी करण्याकडे माझा कल असतो. मी अजीबात फटाके फोडत नाही. फटाक्यांमुळे प्रदूषण तर होतेचं त्याचसोबत पशू-पक्षांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे माझं तर स्पष्ट मत आहे की, फराळ खाऊन मजा करा पण फटाके फोडू नका. डायट म्हणाल तर मी कितीही विचार केला तरी डायट नाही करू शकत. मी फूडी असल्यामुळे मला सतत खायला आवडतं. त्यामुळे डायटला सुरुवात जरी केली तरी ते मी पूर्ण करू शकत नाही.
शब्दांकन- चैताली गुरव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा