दीपिका पदुकोणबरोबरचा स्वत:चा फोटो सोशल मीडियावर टाकत आमची जोडी सुंदर दिसते ना? असा प्रश्नदेखील रणवीर सिंगने विचारला आहे. रणवीरने बॉलिवूडमधील चार वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून, आतापर्यंत त्याने अभिनय केलेल्या चित्रपटांच्या सेटवरील स्वत:ची काही छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. दीपिका पदुकोणबरोबरचे त्याचे हे छायाचित्र त्यापैकी एक आहे. 

रणवीर आणि दीपिका कॅमेऱ्यामध्ये फोटो पाहात असतानाचे हे छायाचित्र संजय लीला भन्साळींच्या ‘गोलियों की रासलीला रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवरील आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रणवीर आणि दीपिकामध्ये निर्माण झालेली वाढती जवळीक चर्चेचा विषय होती.

ranveer-deepika-embed

 

Story img Loader