बॉलीवूड बिग बी अमिताभ बच्चन यांना कोणी सोशल साइट्सवरून ब्लॉक करण्याचा विचार तरी करू शकतं का? अहो तसं कोणी त्यांना ब्लॉक केलेलं तर नाहीच. पण, अमिताभ आणि अनुष्कामध्ये खोडकर असे ट्विटरवॉर आज पाहायला मिळाले. झाले असे की, अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या ट्विटर अकाउंटवरून काहीजणांना ब्लॉक करायचे ठरवले आहे. अनुष्काला तिच्या आजूबाजूला सकारात्मकता शक्ती हवी आहे. त्यामुळे ट्विटरवर वायफळ बडबड करणा-यांना तिने ब्लॉक करायचे ठरविले आहे. तसे ट्विट तिने करताच, अमिताभ बच्चन यांनी एक वायफळ ट्विट करत अनुष्काला म्हटले, आता मला ब्लॉक करण्याची हिंमत तर करून बघ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


या ट्विटमुळे अमिताभ यांचा मस्तीभरा अंदाज ट्विटरकरांना पुन्हा एकदा पाहावयास मिळाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont you dare block me says amitabh bachchan to anushka sharma