अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या ‘रात अकेली है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. कानपूरमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. चित्रीकरणादरम्यान अनेकदा नवाजला काही चाहत्यांच्या अरेरावीला सामोर जावं लागत आहे. अनेक चाहते सुरक्षारक्षकांचा डोळा चुकवून सेटवर येत आहे. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी सेटवर जमत आहे.
चित्रीकरणादरम्यान नवाजला काही चाहत्यांनी भर रस्त्यात घेरलं. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली. नवाजच्या सुरक्षारक्षकाचा डोळा चुकवून एका चाहत्यानं थेट नवाजच्या गळ्यात हात घालून त्याला मागे खेचलं. नवाजसोबत त्यानं बळजबरीनं फोटो घेण्याचा प्रयत्न केला. अखेर सुरक्षारक्षक धावत आले आणि नवाजला गर्दीतून बाजूला केलं.
‘रात अकेली है’ चित्रपटात नवाज उत्तर प्रदेशमधल्या एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. उत्तर प्रदेशमधल्या काही गावांत या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. यावेळी अनेकदा नवाजला चाहत्यांच्या मनमानीला समोरं जावं लागत आहे.