९५ व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर २०२३ च्या नामांकनांची घोषणा दिवसांपूर्वी करण्यात आली. आता अवघ्या काही दिवसांवर हा पुरस्कार सोहळा येऊन ठेपला आहे. ‘RRR’ चित्रपटामधील ‘नाटू नाटू’ हे गाणं आता बेस्ट ओरिजनल सॉंग या कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट झालं आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटाची एंट्री ऑस्करमध्ये झाली आहे. या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री श्रिया सारनने आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.
श्रिया सारनने या चित्रपटात राजुच्या आईची भूमिका साकारली आहे. ती असं म्हणाली, “राजामौली सरांनी या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. तसेच राम चरण, तारक, आलिया, अजय या सगळ्यांनीच, मी देवाचे खूप आभार मानते कारण मी या चित्रपटाचा भाग आहे. मला असं वाट्तजे काही घडायचं असेल ते घडून राहतं. मी ‘RRR’ चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देते आणि प्रार्थना करते त्यांच्यासाठी जे लायक आहे ते त्यांना मिळो. ते ऑस्करसाठी पात्र आहेत त्यांना मिळायला हवं.” अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“इंडस्ट्रीमध्ये आता…” बॉलिवूडमधील ‘या’ गोष्टीबद्दल रणबीर कपूरने व्यक्त केली खंत
राजामौली दिग्दर्शित दाक्षिणात्य चित्रपट ‘RRR’ची सध्या जागतिक स्तरावर चांगलीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ओरिजनल साँगचा अवॉर्ड जिंकला होता. जगभरातील दिग्गज कलाकार मंडळीसुद्धा या चित्रपटाच्या प्रेमात पडली आहेत. हॉलिवूड दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनीदेखील राजामौली यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले.
या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी १९२० मधील ब्रिटिशकालीन भारतातील स्वतंत्र सेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह ब्रिटीश कलाकार रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.