एका आगळ्यावेगळ्या ड्राय डे ची धम्माल गोष्ट घेऊन येत आहे आगामी मराठी चित्रपट ‘ड्राय डे’. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १३ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी सोशल मीडियावर त्याचा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल यांची केमिस्ट्री पाहायला मिळते. पण त्यासोबतच पोस्टरवरील दारूची बाटलीदेखील आपलं लक्ष वेधून घेते. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येदेखील हीच गंमत दिसून येते. चार मित्रांची धम्माल मस्ती दाखवणाऱ्या या ट्रेलरमधून आजच्या तरुण पिढीची चंगळ आणि आयुष्य जगण्याची त्यांची मनमौजी वृत्ती आपल्याला दिसून येते. तसंच ऋत्विक – मोनालिसा या फ्रेश जोडीचा रोमान्स जरी यात असला तरी, ब्रेकअपनंतरची धम्मालदेखील यामध्ये बघायला मिळते. रात्रीची धम्माल पार्टी आणि त्यातून उलगडत जाणारी या चित्रपटाची गोष्ट प्रेक्षकांना सिनेमागृहात खिळवून ठेवेल अशी आहे.

जाणून घ्या, अवघ्या १९व्या वर्षी ‘मिस इंडिया’ झालेल्या अनुकृती वासबद्दल…

‘ड्राय डे’ च्या या मजेशीर ट्रेलरबरोबरच ‘दारू डिंग डांग’ ‘अशी कशी’ आणि ‘गोरी गोरी पान’ ही गाणीदेखील तुफान गाजत आहे. दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच या चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. यामध्ये कैलाश वाघमारे, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, आयली घिए, सानिका मुतालिक, अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकारदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ब्रेकअपनंतरच्या खऱ्या धम्माल पार्टीचा आनंद लुटण्याचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकदेखील या आगळ्यावेगळ्या ‘ड्राय डे’ च्या प्रतीक्षेत असतील, हे निश्चित !

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dry day marathi movie trailer released starring rhitvik kendre and monalisa bagal