हिंदी मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे रुबिना दिलैक. रुबिनाने हिंदी मालिकांमध्ये काम करत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. छोट्या पडद्यावर तिने साकारलेली आदर्श सूनेची भूमिका तर आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. ‘छोटी बहू’ या मालिकेमुळेच ती नावारुपाला आली. हिंदी ‘बिग बॉस’मध्ये तर रुबिनाचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळाला. या शोमध्ये ती अगदी स्टायलिस्ट लूकमध्ये दिसली. सतत सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही अभिनेत्री आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
रुबिनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने बोल्ड ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. पण हा ड्रेसच तिच्यासाठी अडचण निर्माण करणारा होता. रुबिना चालत असताना तिचा ड्रेस सारखा हवेच्या वेगाने उडत होता. यामुळे तिचा काही वेळापुरता चांगलाच गोंधळ उडाला. पण त्यानंतर तिने ड्रेस सावरत कॅमेऱ्यासमोर विविध पोझ दिल्या.
आणखी वाचा – VIDEO : गोड हास्य अन् सुंदर डोळे, शहनाजला पूर्वीसारखं पाहून नेटकरीही झाले खूश
रुबिनाने पर्पल रंगाचा थाय-हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता. तसेच पांढऱ्या रंगाचे हिल्स आणि सॉफ्ट कर्ल केस तिच्यावर अगदी शोभून दिसत होते. या नव्या लूकमध्ये रुबिना अगदी सुंदर दिसत होती. रुबिना सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करताना दिसते. तसेच सोशल मीडियाद्वारे ती तिच्या चाहत्यांशी संवाद देखील साधताना दिसते.
आणखी वाचा – कतरिनाने पतीसोबत शेअर केला स्विमिंग पूलमधील सर्वात हॉट फोटो, दिसला रोमँटिक अंदाज
काही दिवसांपूर्वी रुबिनाने नारंगी रंगाच्या ड्रेसमधील व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. काही तासांमध्येच या व्हिडीओला हजारो लाईक आणि कमेंट्स मिळाल्या होत्या. पारंपरिक ड्रेसबरोबरच वेर्स्टन आऊटफिटमध्येही रुबिना तितकीच गोड दिसते. रुबिना ‘खतरों के खिलाडी’च्या पुढच्या सीझनमध्ये दिसणार असल्याचं देखील बोललं जातंय.