जगातला प्रत्येक जण थोडा तरी अतरंगी असतोच. एखादा अतिशहाणा दिसला की नकळत म्हटले जाते काय वाय झेड आहे. याच वाय झेड म्हणजे धम्माल, मस्ती, दंगा आणि मुख्य म्हणजे अॅटीट्यूड असलेल्यांसाठी समीर संजय विध्वंस घेऊन येत आहे त्याचा आगामी चित्रपट ‘YZ’.
डबल सीट या चित्रपटानंतर दिग्दर्शक समीर विध्वंस आणि क्षितीज पटवर्धन ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. डबल सीटच्या यशानंतर समीर आणि क्षितीजच्या ‘YZ’ चित्रपटाकडून बरीच अपेक्षा केली जात आहे. पण त्यांचा हा चित्रपट सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो की नाही हे कळण्यासाठी तुम्हाला जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. समीरने चित्रपटाविषयीची पोस्ट फेसबुक या सोशल माध्यमावर प्रसिद्ध केली असून त्याने म्हटले की, या बद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल तर जून पर्यंत थांबाव लागेल पण तोपर्यंत “बिनधास्त सांगा मी ‘YZ’ आहे !”
गेले काही दिवस सई ताम्हणकर आणि समीर सोशल माध्यमांवर काही विचित्र पोस्ट टाकत होते. त्यामुळे या पोस्टमागे नक्की काय गुपित आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज त्याचा खुलासा करण्यात आला. मात्र, या चित्रपटात नक्की कोणते कलाकार दिसणार याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. पण सई ज्या पद्धतीने चित्रपटाची प्रसिद्धी करतेय ते पाहता बहुदा ती चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. ‘YZ’ चित्रपटाची निर्मिती संजय छाबरिया आणि अनिष जोग करणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा