तीन वेगवेगळय़ा काळात घडणारी त्याच व्यक्तिरेखांच्या कथा सांगणारी ‘दुरंगा’ ही वेबमालिका झी ५ वर प्रदर्शित झाली आहे. ही वेबमालिका ‘फ्लॉवर ऑफ इव्हिल’ या कोरियन वेबमालिकेचा रिमेक आहे. गोल्डी बेहल आणि श्रद्धा सिंग यांची निर्मिती असलेल्या या वेबमालिकेत गुलशन देवियाह, द्रष्टी धामी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. समित आणि इरा यांच्यातील नाते उलगडणारी ही कथा. समित एक चांगला प्रियकर, एक चांगला नवरा, उत्तम वडील अशा भूमिका वठवतो आहे. मात्र खरोखरच समित तसा आहे? की त्याचा खरा चेहरा त्याने लपवला आहे. भूतकाळातील घटनांची जोड समित आणि इरा यांच्या कथेला देण्यात आली आहे. मराठमोळा अभिनेता अभिजीत खांडकेकर याचीही या वेबमालिकेत महत्त्वाची भूमिका आहे.- कधी – प्रदर्शित, कुठे – झी ५ , कलाकार – गुलशन देवियाह, द्रष्टी धामी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिल्ली क्राईम सीझन २
दिल्ली क्राईम या वेबमालिकेचे पहिले पर्व नेटफ्लिक्सवर चांगलेच गाजले. या वेबमालिकेतील भूमिकेसाठी अभिनेत्री शेफाली शाहला पुरस्कारही मिळाले. पहिल्या वेबमालिका निर्भया घटनेवर आधारित होती. तर दुसऱ्या भागात दिल्लीला त्रस्त करून सोडणाऱ्या कच्छा बनियन गॅंगचा थरार पाहायला मिळणार आहे. रात्री घरात शिरून लूटमार करणाऱ्या, लूटमार करून झाल्यावर घरातील लोकांना निर्दयपणे मारून टाकणाऱ्या या गँगने दिल्लीत दहशत निर्माण केली होती. या वेबमालिकेत शेफाली शाह पुन्हा एकदा डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या भूमिकेत दिसणार आहे. तनुजा चोप्रा दिग्दर्शित ‘दिल्ली क्राईम सीझन २’ या वेबमालिकेत शेफाली शाहबरोबर आदिल हुसैन, रसिका दुग्गल, राजेश तेलंग आणि तिलोत्तमा शोम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.- कधी – २६ ऑगस्ट, कुठे – नेटफ्लिक्स,कलाकार – शेफाली शाह, आदिल हुसैन, रसिका दुग्गल ,राजेश तेलंग आणि तिलोत्तमा शोम.

कठपुतली
बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमारचा ‘कठपुतली’ हा नवीन चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. अक्षयच्या या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी तिकीटबारीवर सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळे अचानकपणे जाहीर करण्यात आलेल्या हा त्याचा चित्रपट त्याला ओटीटीवर तरी तारणार का? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. या चित्रपटात हत्यासत्राचे रहस्य उलगडणाऱ्या पोलीस अधिकारी अर्जुन सेठीची भूमिका अक्षय साकारताना दिसणार आहे. अक्षयकुमारच्या बेलबॉटमचा दिग्दर्शक रंजीत तिवारी यानेच ‘कठपुतली’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हीची या चित्रपटात भूमिका आहे. ‘रत्सासन’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा हा रिमेक आहे.- कधी – २ सप्टेंबर, कुठे – डिस्ने हॉटस्टार,कलाकार – अक्षयकुमार, रकुल प्रीत सिंह

महारानी २
अभिनेत्री हुमा कुरेशीने ओटीटीवर वेबमालिकांमधून काम केले असले तरी सोनी लिव्हवरील ‘महारानी’ या वेबमालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. रानी भारती ही एका राजकारण्याची अशिक्षित पत्नी ते आता राजनेता म्हणून आपली कारकीर्द उभी करणारी हुशार, सक्षम स्त्री असा तिचा प्रवास पहिल्या भागात लोकांनी पाहिला होता. आता एक धुरंधर राजकारणी म्हणून ती वेबमालिकेच्या दुसऱ्या भागांतून लोकांसमोर येणार आहे. आधीच्या भूमिकेपेक्षा रानी भारती अधिक सशक्त भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार असल्याची माहिती हुमाने दिली. सुभाष कपूर यांची कथाकल्पना असलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन रवींद्र गौतम यांनी केले आहे.-कधी – २५ ऑगस्ट, कुठे – सोनी लिव्ह,कलाकार – हुमा कुरेशी, सोहम शाह, अमित सियाल, विनीत कुमार, दिव्येंदु भट्टाचार्य, प्रमोद पाठक.