गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर हे दोघे लग्नबंधनात अडकले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे त्यांनी लग्न केले. या सोहळ्यासाठी अनेक लहान मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. तर काही कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. एवढचं काय तर त्यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.
कतरिना आणि विकीच्या लग्नानंतर सोशल मीडियावर विक-कॅट हे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागलं होतं. त्यानंतर ड्युरेक्स या कंडोम बनवणाऱ्या कंपनीने एका हटके अंदाजात कतरिना आणि विकीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “लग्नाला आम्हाला बोलवायला विसरलात ते एकवेळ चालेल पण….लग्नानंतर नाही बोलावलं तर….”, असे म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेले हे मीम सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
आणखी वाचा : विकी-कॅटच्या नवीन घराचा अनुष्काला होतोय त्रास
कतरिना आणि विकी ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्न बंधनात अडकले आहेत. त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने, कोणतीही गोष्ट जाहीर न करता, अगदी कडक नियम पाळून हा विवाहसोहळा पार पडला. पंजाबी पद्धतीने त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नासाठी पाच मजल्यांचा केक एका इटालियन शेफकडून बनवून घेण्यात आला असून भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही पद्धतींचे स्वादिष्ट पदार्थ पाहुण्यांसाठी ठेवण्यात आले आहेत. या दोघांच्याही चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.