गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद व भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यामधील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फीच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान मी कोणते कपडे परिधान करावेत हे निवडण्याचा मला अधिकार आहे असं उर्फीने म्हटलं. दरम्यान हा वाद आणखीनच चिघळला असताना उर्फीने नवा व्हिडीओ शेअर केला आहे.
उर्फी जावेदचा टॉपलेस व्हिडीओ
उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्याविरोधात शुक्रवारी(१३ जानेवारी) पोलिसांत तक्रार दाखल केली. उर्फीचे वकील नितीन सातपुते यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर हे प्रकरण आणखीनच चिघळलं. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तक्रारीची दखल घेत उर्फीला नोटीस बजावली.
आणखी वाचा – ३९ हजार ५२६ महिलांवर अत्याचार, २५०६ बलात्कार…चित्रा वाघ, उर्फी पुराण झालं असेल तर यावरही बोला!
पाहा व्हिडीओ
उर्फीने मात्र तिची फॅशन कायम करताना दिसत आहे. वादादरम्यानही ती सोशल मीडियाद्वारे बोल्ड फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. आताही तिने तिचा चक्क टॉपलेस व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने टॉप परिधान केलेला नाही. फक्त उर्फीने अंगावर पंख लावलेले आहेत.
आणखी वाचा – ‘वेड’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट, आतापर्यंत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
उर्फीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. या ड्रेसला काय नाव द्यायचं?, हे खूपच लज्जास्पद आहे, हिचं डोकं ठिकाण्यावर नाही अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून दिल्या आहेत. आता उर्फीच्या या व्हिडीओनंतर वादाला नवं वळण मिळणार का? हे पाहावं लागेल.