बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहना शेट्टीने ‘तडप’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात अहानसोबत अभिनेत्री तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट आज, ३ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी सलमान खान, दिशा पटाणी, अनुपम खेर, रितेश देशमुख, काजोल, जिनिलिया डिसुजा, हर्षवर्धन कपूर अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. पण सध्या सोशल मीडियावर अहान आणि काजोलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काजोल अहानला मूर्ख असे बोलताना दिसत आहे.
अहान आणि काजोलचा व्हिडीओ बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानीने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुनील शेट्टीची पत्नी माना, अहान शेट्टी आणि काजोल दिसत आहे. अहान आणि माना उभे असतात. तेवढ्यात फोटोग्राफर त्या तिघांना फोटोसाठी पोज देण्यास सांगतात. त्यावेळी काजोल तिचा फोन काढते आणि अहानला सेल्फी घेण्यास सांगते. पण अहान सेल्फी घेण्याऐवजी बूमरँग मोड सिलेक्ट करतो. तेव्हा काजोल चिडते आणि ‘मूर्ख.. फोटो काढ’ असे म्हणते. काजोलचे चिडणे पाहून अहानला हसू अनावर होते..
आणखी वाचा : सलमान खान ऑनस्क्रीन किसिंग सीन आणि इंटिमेट सीन का देत नाही?; जाणून घ्या काय आहे नेमकं कारण
काजोलने हा बूमरँग व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत तुझे इंडस्ट्रीमध्ये स्वागत आहे आणि तुला खूप खूप शुभेच्छा असे म्हटले आहे. अहानची बहिण अथियाने सलमान खानच्या ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
‘तडप’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलान लुथारियाने केले आहे. तर चित्रपटाची कथा रजत अरोराने लिहिली आहे. या चित्रपटात अहान शेट्टीने काही इंटिमेट सीन्स दिल्यामुळे चित्रपट चर्चेत होता.