बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान कित्येक वर्षांपासून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आला आहे. त्याच्या चाहत्यांची संख्याही खूप मोठी आहे. दरवर्षी तो असा एक चित्रपट घेऊन येतो, जो प्रेक्षकांच्या वर्षानुवर्षे लक्षात राहतो. आमिर खान आज आपला ५७वा जन्मदिन साजरा करत आहे. त्याने आपल्या आयुष्याची ३० वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आज तो बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय आणि नावाजलेल्या चेहऱ्यांपैकी एक आहे. परंतु आमिर खानने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अथक परिश्रम केले आहेत. त्यावेळी त्यांने पडेल ते काम करण्याची तयारीही दाखवली.

आमिर खान आता जितका प्रसिद्ध आहे तितका तो आधी नव्हता. एक लहान कलाकार म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याकाळी आमिरला खूप कमी लोक ओळखायचे. तेव्हा सोशल मीडियासारखी माध्यमे देखील नव्हती. त्याकाळी तो रस्त्यावर फिरून स्वतः आपल्या चित्रपटाचे पोस्टर रिक्षावर चिटकवायचा. सध्या यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
phanindra sama success story
Success Story : दोन मित्रांच्या मदतीने ५ लाखांत व्यवसायास प्रारंभ; मेहनतीच्या जोरावर उभे केले तब्बल ७ हजार कोटींचे साम्राज्य
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

The Kashmir Files : ‘देशविरोधी सरकार जुन्या जखमा कोरून…’ काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे भाजपावर टीकास्त्र

आमिर खानने १९७३ मध्ये ‘यादों की बारात’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर ‘मदहोश’ आणि ‘होली’ या चित्रपटात त्याने काम केले. मात्र, १९८८ च्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून आमिर खानने अधिकृतरीत्या बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात जुही चावलाही मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या रोमिओ आणि ज्युलिएटपासून प्रेरित होता. या चित्रपटाच्या यशासाठी आमिर खानने सर्वतोपरी प्रयत्न केले होते, तो प्रयत्नही यशस्वी झाला आणि चित्रपट हिट झाला.

बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानला परिचयाची गरज नाही. आपल्या अभिनयाने त्याने चित्रपट विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. २००३ मध्ये भारत सरकारने त्याला पद्मश्री आणि २०१० मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केले. एवढेच नाही तर चीन सरकारने २०१७ मध्ये ही मानद पदवीही दिली होती.

Story img Loader