बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आयकर विभागानं २१५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी जॅकलिनला आरोपी बनवले आहे. ईडीकडून आज जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव २०० कोटींच्या मनी लँड्रिंग प्रकरणात चांगलेच चर्चेत आहे. ठग सुकेश चंद्रशेखर यांच्याशी तिचे नाव जोडलं गेले होते. यामुळे जॅकलिन ही आयकर विभागाच्या रडारवर होती. या काळात जॅकलिनची कसून चौकशी देखील झाली होती. मात्र स्वतःवर लावण्यात आलेल्या आरोपांचं जॅकलिननं खंडन केलं होतं. तर दुसरीकडे सुकेश हा गुन्हेगार आणि खंडणीखोर असल्याची माहिती जॅकलिनला यापूर्वीच होती, असा दावा ईडीने केला आहे.
५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी!
जॅकलिन फर्नांडिसचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे अनेक कनेक्शन समोर आले आहेत. त्यामुळे ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ईडीने यापूर्वीही २१५ कोटी रुपयांचा खंडणीचा आरोप केला होता. त्यानंतर आज ईडी तिच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहे.
आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिसला ठग सुकेश चंद्रशेखरनं ५.७१ कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. एवढंच नाही तर त्यानं तिच्या कुटुंबीयांनाही महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. हा सर्व पैसा सुकेशनं लोकांची फसवणूक करून आणि गुन्हेगारीतून कमावला होता. दिल्लीमध्ये तुरुंगात असताना त्यानं एका महिलेचे २०० कोटी रुपये फसवणूक करुन लांबवले होते. आयकर विभागनं दिलेल्या माहितीप्रमाणे जॅकलिनच्या विरोधातील ही प्राथमिक कारवाई आहे. या प्रकरणात तिच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात ED ची मोठी कारवाई, ७.२७ कोटीं संपत्ती जप्त, वाचा संपूर्ण प्रकरण
तसेच सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. जॅकलिनसोबतच या आरोपपत्रात अभिनेत्री नोरा फतेहीचाही उल्लेख केला आहे. सुकेशने नोराला खूप महागडी कार भेट म्हणून दिली होती. या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वीच दोन्ही अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली होती.