सध्या बड्या बड्या राजकीय नेत्यांवर ईडीची कारवाई होतानाच्या बातम्या आपल्या कानावर येत आहे. गेले बरेच महिने ही सरकारी यंत्रणा चांगलीच कंबर कसून कामाला लागली आहे. राजकीय नेत्यांबरोबरच आता चित्रपट निर्मात्यांवरही ईडीची धाड पडायला सुरुवात झाली आहे. चेन्नईमधील प्रसिद्ध निर्मिती कंपनी LYCA प्रोडक्शन्सच्या कार्यालयावर नुकतीच ईडीने धाड टाकल्याचे वृत्त समोर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजामौली यांचा ‘आरआरआर’, रजनीकांत यांचा ‘२.०’, अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ ते नुकताच प्रदर्शित झालेला मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन’ असे बरेच सुपरहिट चित्रपट LYCA प्रोडक्शन या बॅनरखालीच तयार झाले. या प्रोडक्शन कंपनीच्या आवारातच ही छापेमारी झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्टेटमेंट आलेले नाही.

आणखी वाचा : “राहुल गांधी फार भोळे…” पीयूष मिश्रा यांचा मुलाखतीदरम्यान खुलासा, पंतप्रधान मोदींचाही केला उल्लेख

काही मीडिया रिपोर्टनुसार या कंपनीवर मनी लाॅण्ड्रिंगचा गुन्हा लावल्यामुळेच केंद्रीय यंत्रणा या कंपनीचा तपास करीत असल्याचे म्हटले जात आहे. ईडीने LYCA या कंपनीच्या तब्बल ८ ठिकाणांवर छापेमारी केली असून अजूनही काही ठिकाणी हा तपास सुरू आहे. या प्रोडक्शन कंपनीची स्थापना सुबास्करन अलिराजा यांनी २०१४ मध्ये केली होती.

गेल्या काही वर्षांत या कंपनीच्या बॅनरखाली तयार झालेले कित्येक चित्रपट सुपरहिट ठरले. राजामौली यांचा बहचर्चित ‘आरआरआर’ LYCA प्रोडक्शन या बॅनरखालीच बनला. या चित्रपटाला संपूर्ण जगभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. याशिवाय ‘कब्जा’, ‘थुनिवू’ या चित्रपटांनीसुद्धा चांगलीच कामगिरी केली. नुकताच प्रदर्शित झालेल्या मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटानेही रेकॉर्ड ब्रेक कमाई केली.