मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी प्रसिद्ध निर्माती प्रेरणा अरोरा यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केलो. प्रेरणा यांच्या विरोधात ३१ कोटी ६० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी २०१८ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. त्याआधारे ईडीने हा नवा गुन्हा दाखल केला.
निर्माता वासू भगनानी यांच्या ‘पूजा फिल्म्स’चे निर्मिती व्यवस्थापक नागेश वैदिकर यांनी याप्रकरणी केलेल्या तक्रारीवरून ‘क्रिआज’च्या संचालक अरोरा यांच्याविरुद्ध २०१८ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. तक्रारीनुसार, पॅडमॅन आणि केदारनाथ चित्रपटांसाठी आरोपींनी भगनानी यांच्याकडून १० कोटी रुपये मागितले होते. ‘क्रिआज’ने करारानुसार ‘पूजा फिल्म्स’ला पैसे दिले नाहीत. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अरोरा व इतर आरोपींना चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत तीन वेळा समन्सही पाठवले होते.