Ed Sheeran surprise performance on Bengaluru street Viral Video : ब्रिटनचा प्रसिद्ध गायक एड शीरन हा सध्या भारतात आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने चेन्नई येथे एआर रहमानबरोबर परफॉर्म केले होते. ग्रॅमी आवॉर्ड विजेता एड शीरन यानंतर रविवारी बंगळुरू येथे दाखल झाला. दरम्यान बंगळुरू येथे रस्त्याच्या कडेला माइक आणि गिटार घेऊन गाणे गातानाचा त्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये शीरन हा रस्त्याच्या कडेला उभा राहुन गाताना दिसत आहे. इतका मोठा गायक बंगळुरूमधील रस्त्यावर गाणे गात असल्याचे पाहून त्याच्या चागत्यांची चांगलीच गर्दी येथे गोळा झाली. पण यानंतर थोड्याच वेळात या ठिकाणी पोलीस येऊन धडकले आणि त्यांनी एड शीरनला माइक आणि गिटार घेऊन निघून जाण्यास सांगितलं. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओ तुफान व्हायरल
एड शीरनचा बंगळुरूच्या चर्ट स्ट्रीटवर सुरू असलेला हा शो पोलिसांनी थांबवला. यामागील कारण म्हणजे, मिळालेल्या माहितीनुसार एड शीरन या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कॉन्सर्ट करण्याची परवानगी त्याच्याकडे नव्हती. दरम्यान एड शीरनचा हा बंगळुरूमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. या व्हिडीओवर लोक भरभरून कमेंट्स करत आहेत. अनेकांनी बंगळुरू पोलिसांचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली आहे.
#BREAKING: Ed Sheeran gets unplugged by Bengaluru cops as he was performing on Church Street on Sunday morning. The cops, unaware of who he was, said prior permission was not taken to perform. pic.twitter.com/k7gpdGj9tu
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) February 9, 2025
मॅथमेटिक्स टूर (Mathematics Tour)
एड शीरन हा जगप्रसिद्ध गायक सध्या त्याच्या मॅथमेटिक्स टूरनिमीत्ताने भारतात आहे आणि आज (रविवारी) मदवारा येथे NICE ग्राउंडवर होत असलेल्या कॉन्सर्टमध्ये तो परफॉर्म करणार आहे. देशभरातली त्याचे चाहते रात्र ७ आणि ११ वाजता लागोपाठ होत असलेल्या कॉन्सर्ट्सची आतुरतेने वाट पाहात आहेत.
एड शीरन हा त्याच्या शेप ऑफ यू, परफेक्ट, कॅसल ऑन द हिल, बॅड हॅबिट्स आणि थिंकिंग आऊट लाउड या जगभरात हिट ठरलेल्या गाण्यांसाठी ओळखला जातो. त्याते शेप ऑफ यू गाने जगभरात गाजले आहे. त्याचे भारतात देखील कोट्यवधी चाहते आहेत. त्याच्या कॉन्सर्टच्या तिकीटांसाठी मोठी चढाओढ लागल्याचे पाहायला मिळते. सध्या तो भारतात असून लोक मोठ्या संख्यने त्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसतात.