गेले काही महीने आपण सोशल मिडियावरचा बॉयकॉट ट्रेंड बघत आहोत. मोठमोठ्या स्टार्सचे चित्रपट प्रेक्षकांनी बॉयकॉट केले आहेत. चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी जरी होत असली तरी अजून अशा कोणत्याच चित्रपटावर बंदी घातली गेलेली नाही, पण अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’ हा गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

आणखी वाचा : आपल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या कशा सोडवेल माधुरी? आगामी चित्रपट ‘मजा मा’चा ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटात चित्रगुप्ताचं चित्रण योग्य पद्धतीने केलं नसल्याने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होताना दिसत आहे. कुवैत, कर्नाटक, उत्तर प्रदेश याठिकाणांहून या चित्रपटाला जोरदार विरोध होत असताना मंत्र्यांनीही याला विरोध दर्शवला आहे. मध्यप्रदेशचे शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांच्याकडून ‘थँक गॉड’वर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय सूचना प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे सारंग यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

विश्वास सारंग यांनी अनुराग ठाकूर यांना थँक गॉड सिनेमाला बंदी घालण्याबाबत एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये “अजय देवगण आणि सिध्दार्थ मल्होत्रा यांच्या ‘थँक गॉड’ या सिनेमात देवाचं रूप चुकीच्या पध्दतीने दाखवण्यात आलं आहे. समाजात चुकीचा संदेश यामुळे जाऊ शकतो. त्यासाठीच या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी,” असं म्हटलं आहे.

हेही वाचा : आमिर, अक्षयनंतर अजय देवगणला बॉयकॉट करण्याची होतेय मागणी, जाणून घ्या कारण

या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राच्या पात्राचा एक अपघात होतो आणि मृत्यूनंतर त्याची भेट थेट चित्रगुप्ताशी होते. भारतीय पुराण ग्रंथात चित्रगुप्त हा एक असा देवता आहे जो मानवाच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा हिशोब ठेवतो. चित्रपटात अजय देवगण हा चित्रगुप्ताच्या भूमिकेत दिसत असून ते पात्र फार विनोदी दाखवण्यात आलं असल्याने ‘थँक गॉड’ विरोधात सर्वजण पेटून उठले आहेत.

Story img Loader