बऱ्याच यशस्वी हिंदी चित्रपटांचे यश गाठीला घेऊन दगडी चाळ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी मंगलमूर्ती फिल्म्स ही चित्रसंस्था आता अजून एक जीवनपट घेऊन येत आहे. भगवान आबाजी पालव म्हणजेच आपले भगवान दादा यांचा जीवनपट मंगलमूर्ती फिल्म्स प्रस्तुत आणि किमया मोशन पिक्चर्स निर्मित ‘एक अलबेला’…
शोला जो भडके दिल मेरा धडके…दर्द जवानी का सताये भरभरके… म्हणत सगळ्यांनाच साध्या सरळ नृत्याकडे आकर्षित करणाऱ्या भगवान दादांच्या जीवनावर चित्रपट येऊ घातला आहे. गेले कित्येक दिवस हा चित्रपट विविध कारणांनी चर्चेत आहे. भगवान दादांची भूमिका मंगेश देसाई साकारत आहे. त्यांनी आत्मसात केलेला भगवान दादांचा लूक, अभिनय आणि त्यांची नृत्यशैली याची चर्चा सिनेसृष्टीत सुरू आहे. या चित्रपटाचा अजून एक चर्चेचा विषय म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन…एक अलबेला च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. “प्रसिध्दीपासून लांब असलेल्या या नटाची जादू प्रेक्षकांच्या मनात नक्की घर करेल असा आशावाद मंगलमूर्ती फिल्म्स च्या संगीता अहिर यांनी व्यक्त केला. तर भगवान दादांसारख्या दिग्गज कलाकाराचा जीवनपट पुन्हा एकदा आताच्या पिढीसमोर उभारण्याची संधी मिळाल्यामुळे आनंदी असल्याचे त्या म्हणाल्या.”
शेखर सरतांडेल यांच्या दिग्दर्शनाने सजलेला असा ‘एक अलबेला’ हा जीवनपट येत्या 10 जून ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
VIDEO: प्रसिध्दीपासून लांब असलेल्या नटाची जादू ‘एक अलबेला’
भगवान आबाजी पालव म्हणजेच आपले भगवान दादा यांचा जीवनपट
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-04-2016 at 11:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ek albela releasing on 10 june