रेश्मा राईकवार
सध्याच्या काळात जिथे शिक्षण, नोकरी, करिअर, स्वत:चं घर, गाडी, रग्गड गुंतवणूक मग लग्न आणि त्यानंतर ठरवून मुलांचं नियोजन असं सगळं आखीव-रेखीव पद्धतीने केलं जातं. तिथे समीर आणि सायली या अगदी मनमोकळय़ा, काहीही न ठरवता जे येईल त्याला आनंदाने सामोरं जात प्रत्येक क्षण भरभरून जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्याची तरुण गोष्ट ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटात पाहायला मिळते. अर्थात, चित्रपटाचा विषय वेगळा असला तरी ज्या पध्दतीने समीर आणि सायली या दोन व्यक्तिरेखा, त्यांच्या अवतीभवतीचं जग सहजसुंदर पध्दतीने रंगवण्यात आलं आहे ते पाहताना त्यातला ताजेपणा आणि जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मनाला अधिक भिडतो.

शंभरपैकी निम्म्याहून अधिक चित्रपटांचे विषय आणि समस्त मराठी वाहिन्यांवरील लोकप्रिय मालिकांचा मसावि काढला तर तो गुंतागुंतीचे नातेसंबंध, त्यातील भडक नाटय़ आणि अतिरंजक मांडणीवर स्थिरावतो. या सगळय़ांना बाजूला सारत मध्यमवर्गीय घरातील समीर आणि सायली या दोघांच्या आयुष्यात पडलेली गुगलीची गंमत सहजशैलीत रंगवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी केला आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा लेखन वरुण नार्वेकर आणि निपुण धर्माधिकारी दोघांनी मिळून केलेलं आहे. त्यामुळे मूळ गोष्टीत एक सहजताही आहे, काय सांगायचं आहे याबद्दलची स्पष्टताही आहे आणि उगाचच गंभीर काहीतरी सांगायचं आहे किंवा दाखवायचं आहे हा अभिनिवेशही नसल्याने तुमच्या-आमच्या कोणाच्याही घरात घडू शकेल अशी ही गोष्ट वाटते. महाविद्यालयात शिकत असताना समीर आणि सायली एकमेकांना भेटतात, पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडतात. हळूहळू खुलत गेलेलं नातं, शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या नोकरी आणि मग थेट लग्नाच्या बोहल्यावर चढून आयुष्याच्या नव्या टप्प्याची गंमत अनुभवण्यात रमलेल्या या दोघांना लगेच एक सुखद धक्का मिळतो. नुकतेच पती-पत्नी म्हणून नव्याने सुरुवात केलेल्या या जोडप्याला आपण एक नाही, दोन नाही तर चार बाळांचे आईबाप होणार असल्याची ‘गुड न्यूज’ मिळते.

Pandit Vishnu Rajoria on 4 Children
Video: ‘चार मुलांना जन्म द्या, एक लाख रुपये मिळवा’, ब्राह्मण जोडप्यांसाठी परशुराम मंडळाच्या अध्यक्षांची ऑफर
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
Loksatta editorial Copernicus Climate Change Service Report
अग्रलेख: विक्रमी आणि वेताळ
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
गर्भपाताची मागणी करणाऱ्या पालकांच्या भूमिकेचे आश्चर्य,उच्च न्यायालयाची टिप्पणी; मुलगी गतिमंद असल्याच्या दाव्यावरूनही ताशेरे
recession in grains market recession still hangs over agricultural economy
क कमॉडिटीचा – कडधान्य मंदीच्या विळख्यात

हेही वाचा >>>‘कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग’, धर्मवीरच्या ट्रेलरमधून राजकीय टोला

मुळात, लग्न झाल्या झाल्या ध्यानीमनी नसताना आपण आई-बाप होणार हे कळल्यानंतर या जोडप्याच्या मनात उमटणारी पहिली प्रतिक्रिया काय असेल? समीरच्या मनात वेगळं काहीतरी उमटेल आणि सायलीलाही या अनपेक्षित धक्क्याने फक्त आनंद होईल की आणखी काही.. त्यानंतर समोर येणाऱ्या एकेक घटनेला आपापल्या स्वभावाच्या अनुषंगाने सामोरं जात, व्यक्त होत, त्याच्या कारण-परिणामांशी जुळवून घेत स्वत:ला सावरणारे आणि एकमेकांना सावरत पुढे जाणारे समीर आणि सायली या दोघांनाही पाहणं हा खरोखरच खूप ताजंतवाना करणारा अनुभव आहे. या दोघांच्या व्यक्तिरेखा रंगवताना त्यांचं असणं-दिसणं आणि त्याच्या जोडीला त्यांचं कुटुंब, त्या दोघांची जडणघडण कुठल्या मानसिकतेतून झाली आहे या बारीकसारीक गोष्टी कथेच्या ओघात सांगितल्या गेल्या आहेत. चित्रपटाचा विषय त्याच्या शीर्षकातूनच जाहीर केलेला आहे, शिवाय प्रेक्षकांना त्याची कल्पना चित्रपट पाहण्याआधीच आलेली आहे हे लक्षात घेऊन अगदी सरधोपट मांडणीही टाळली आहे. त्यामुळे एकीकडे त्यांची आजची गोष्ट आपल्यापुढे घडते आहे. आणि ती घडत असतानाच कधी समीरच्या मनातून आपण त्यांच्या पहिल्या भेटीकडे जातो. कधी सायलीच्या आठवणीतून आपल्याला त्यांच्या लग्नाची गोष्ट कळते. आणि तिच्या मनातली आई आणि सासू-सासरे या दोघांबद्दलची भावनाही लक्षात येते. समीर आणि सायली ही या कथेतली मुख्य पात्रं आहेत, हे भान चित्रपट कुठेही सोडत नाही. त्यामुळे एकतर मोजक्याच व्यक्तिरेखा आहेत. आणि ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यांच्याकडे अगदीच दुर्लक्षही नाही आणि त्यांच्यावरच अधिक भर देण्याचा अतिरेकही नाही, अशा संयत पध्दतीने आणि खुसखुशीत शैलीत मांडणी केली असल्याने चित्रपट पाहताना कुठेही कंटाळा येत नाही.

‘एक दोन तीन चार’ या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे कलाकारांची निवड. समीर म्हणून निपुण धर्माधिकारीची केलेली निवड आणि त्याच्यापेक्षा अगदीच वेगळी दिसणारी वैदेही परशुरामीने साकारलेली सायली.. जोडी म्हणून असे दोघं वास्तव आयुष्यात सहजपणे एकत्र येणं शक्य नाही असंच आपल्याला वाटतं. त्यामुळे या गोष्टीतला वेगळेपणा या दोघा कलाकारांच्या जोडीपासून सुरू होतो. निपुण आणि वैदेही दोघांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणांचा खूप खुबीने वापर या व्यक्तिरेखांसाठी करून घेतला आहे. या दोघांच्याही सहज अभिनयाने त्यातला गोडवा अधिक वाढवला आहे.

हृषीकेश जोशी, शैला काणेकर, मृणाल कुलकर्णी ते सतीश आळेकर या अनुभवी कलाकारांच्या व्यक्तिरेखा फार मोठय़ा नाहीत, पण जेव्हा त्या पडद्यावर येतात तेव्हा त्या तितक्याच टोकदार आणि प्रभावीपणे उतरल्या आहेत. या सगळय़ाच कलाकारांचा सहज अभिनय आणि त्याचा अचूक उपयोग करून घेणारं वरुणचं दिग्दर्शन या जोडीला चित्रपटासाठी वेगळय़ा पध्दतीच्या गाण्यांची केलेली पेरणी हे सगळं उत्तम जमून आलं आहे. शेवटाकडे येताना चित्रपट काहीसा गोंधळल्यासारखा वाटतो. थोडासा विषय अर्धाच सोडल्यासारखा वा त्यातल्या त्यात गोष्ट पूर्ण करण्यासाठी सहजसोपा केल्यासारखा वाटतो. मात्र अशा कुठल्याही गोष्टीत त्या जोडप्याचा निर्णय हा कथेचा केंद्रिबदू नसतोच, तिथपर्यंतचा त्यांचा प्रवास अधिक अर्थपूर्ण असतो. तो रंगवण्यात चित्रपट कुठेही कमी पडत नाही. त्यामुळे एक, दोन नव्हे तर चारपेक्षाही अधिक चांगल्या गोष्टी जमवून आणणारा चित्रपट मनोरंजनाच्या बाबतीत आपल्याला निश्चितच गुगली टाकत नाही.

एक दोन तीन चार

दिग्दर्शक – वरुण नार्वेकर कलाकार – निपुण धर्माधिकारी, वैदेही परशुरामी, मृणाल कुलकर्णी, हृषीकेश जोशी, शैला काणेकर, सतीश आळेकर, करण सोनावणे.

Story img Loader