सर्व सामन्यांच्या आणि त्यातही आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद लुटण्यास तयार असलेल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील नाट्य म्हणजे ‘एक हजाराची नोट’ हा चित्रपट आहे.
एक हजारची नोट’ ह्या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन श्रीहरी साठे यांनी केले असून दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. हा सिनेमा ग्रामीण भागातील गरीब लोकांभोवती फिरतो. आयुष्यात जसे समोर येते ते स्वीकारण्याशिवाय त्यंच्याकडे दुसरा पर्याय नसतो. जेव्हा त्यांच्याकडे पैसा येत्तो तेव्हा तो पैसा काही अडचणी सोबत घेऊनच येतो. आयुष्यावर अजिबात नियंत्रण नसल्यामुळे आणि प्रतिकार करण्याची शक्ती नसल्याने वाईट गोष्टी त्यांच्यासोबत घडतात तेव्हा प्रतीकार करण्याची शक्ती त्यांच्यात नसते. ज्यांच्या हातात सत्ता असते त्यांच्या नशिबावर अमानवी असे नियंत्रण असते असे श्रीहरी साठे यांनी सांगितले. .
उषा नाईक, संदीप पाठक, गणेश यादव, श्रीकांत यादव, पूजा नायक, देवेंद्र गायकवाड यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ९ मे ला “एक हजारची नोट” हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात  प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा