विधू विनोद चोप्रा यांनी ‘१९४२ अ लव्हस्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित केला होता. सामाजिक, राजकीय असंतोषाच्या वातावरणामध्ये खुलणाऱ्या एका प्रेमावर आधारित या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं होतं. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर जादू चालविण्यासाठी हा चित्रपट नव्या रुपात, नव्या ढंगामध्ये येत आहे. अनिल कपूर, सोनम कपूर, राजकुमार राव आणि सोनम कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. एक अनोखी प्रेमकहाणी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोनम यामध्ये ‘स्वीटी’ ही भूमिका साकारत आहे. या स्वीटीच्या मनात लहानपणापासूनच प्रेमाची ही संकल्पना आहे. अत्यंत सहजतेने जे मिळतं ते प्रेम असतं असं तिला वाटत असतं. तर दुसरीकडे कुटुंबीयांना तिच्या लग्नाची घाई असते. अशातच तिची ओळख साहिल मिर्झाशी होते. या साहिलची भूमिका राजकुमार राव साकारत आहे. पंजाबी कुटुंब आणि काही पंजाबी गाण्यांची धमाल ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच बापलेकीची जोडी म्हणजेच अनिल कपूर आणि सोनम कपूर एकत्र काम करत आहेत. विधू विनोद चोपडाची बहिण शैली चोपडा याचं दिग्दर्शन करत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रथम १२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता मात्र आता हा चित्रपट १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.