‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरची जोरदार चर्चा सुरू असतानाच सर्वांना प्रतिक्षा होती. या सगळ्यात चित्रपटाचा टीझर केव्हा प्रदर्शित होणार असा प्रश्न नेटकऱ्यांना असताना या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यासोबतच ‘डबल धमाका’ म्हणजे या चित्रपटातील गाणीही आज प्रदर्शित करण्यात आली. प्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांच्या हस्ते टीझर लॉन्च करण्यात आला. तर सुनिधी चौहान, शुभंकर कुलकर्णी यांनी चित्रपटातील गाणी सादर केली.
आणखी वाचा : व्हिडीओ मलायकाचा, पण मागच्या काकांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा व्हिडीओ
अभिनेता सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, बालकलाकार अर्जुन पुर्णपात्रे यांच्या मुख्य भूमिका असून, टीझरमध्ये एक वेगळ्या प्रकारची शाळा पाहायाला मिळणार आहे. अनेक लहान मुले दिसत आहेत. गोष्टी सांगणाऱ्या माणसावर आधारित ही चित्रपटाची कथा आहे. तसेच बाबा आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारी आणि नात्यांवर नवा प्रकाश टाकणारी अशी या चित्रपटाची कथा आहे. मोहन आगाशे, सुहास जोशी, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले या कलाकारांनी आपल्या अभिनयाने चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे.
आणखी वाचा : ‘कॉफी विथ करण’चा एका एपिसोडसाठी करण जोहर घेतो इतके कोटी, रक्कम ऐकून व्हाल थक्क
पाहा टीझर
आणखी वाचा : Leg Exercise नंतर अशी होते अवस्था, रितेशने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
डॉ. सलील कुलकर्णी यांच्या चित्रपटातील गाणी म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. याही चित्रपटातील गाण्यांची चर्चा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच होत आहे. या चित्रपटातील गाण्यांची विशेष बाब म्हणजे या चित्रपटासाठी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, सुनिधी चौहान या दिग्गजांनी गाणी गायली आहेत. तसेच शुभंकर कुलकर्णी याचाही आवाज या चित्रपटातील गाण्याला लाभला आहे. या चित्रपटात ‘भिमरूपी’, ‘रे क्षणा’, ‘राम आणि श्याम’, ‘बाळाला झोप का गं येत नाही’ ही अंगाई गीत आहेत. यापैकी ‘रे क्षणा’ या गाण्याला शंकर महादेवन, तर ‘बाळाला झोप का गं येत नाही’ या गाण्याला सुनिधी चौहान यांनी गायली आहेत. ‘राम आणि श्याम’ हे गाणं शुभंकर कुलकर्णीने गायले आहे, तर ‘भिमरूपी’ या गाण्याला अनेक बाल गायकांचा आवाज लाभला आहे. या चित्रपटातील गीते संदीप खरे, समीर सामंत आणि डॉ. सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहेत.
आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…
या कार्यक्रम सोहळ्याला चित्रपटातील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली. कौशल इनामदार, चिन्मयी सुमीत, मृण्मयी देशपांडे, फुलवा खामकर, ऋचा इनामदार उपस्थित होते.
आणखी वाचा : “सेलिब्रिटींनी प्रक्षोभक विधाने केली नाहीत तर…”, देशातील वाढत्या तणावावर मकरंद देशपांडेंचा सल्ला
डॉ. सलील कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार अशी तिहेरी कामगिरी केलेली आहे. विशेष बाब म्हणजे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचे मार्गदर्शन या चित्रपटाला लाभले आहे, तर त्यांचा मुलगा आणि संगीतकार सिद्धार्थ महादेवन, शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करत आहे.
आणखी वाचा : “या सीरिजचा वास्तवाशी…”, ‘मी पुन्हा येईन’च्या कथेबद्दल दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी केला खुलासा
‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाची निर्मिती गजवदन प्रॉडक्शन्सचे अरूंधती दाते, अनुप निमकर, नितीन प्रकाश वैद्य आणि डॉ. सलील कुलकर्णी तसेच शोबॉक्स एन्टरटेंन्मेंटच्या सिद्धार्थ महादेवन, सौमिल श्रुंगारपुरे, सुमेंदु कुबेर आणि सिद्धार्थ खिंवसरा यांनी केली आहे. हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.