झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. अनेक कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहून प्रेक्षकांना फार आनंद होत असल्याचे दिसत आहे. दररोज विविध कलाकार सहभागी होणाऱ्या या कार्यक्रमात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय मंडळीही सहभागी होताना दिसत आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, भाजपा नेत्या चित्रा वाघ, रुपाली ठोंबरे यांसह विविध महिला राजकीय नेत्यांनी किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावली होती. त्यानंतर आता या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज सहभागी होताना दिसणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नुकतंच झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात हजेरी लावली. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला एकनाथ खडसे आणि किरीट सोमय्या ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे गाणं गातांना दिसले. त्यानंतर त्यांना एक फोटो दाखवला जाईल आणि त्यावर त्यांना जे गाणं सुचेल ते गायला सांगितले.

आणखी वाचा : अनुष्का शर्मा मराठमोळ्या जेवणाच्या प्रेमात, फोटो शेअर करत म्हणाली…

आणखी वाचा : आजीबाईंचा ‘चंद्रा’ गाण्यावर डान्स शेअर करत अमृता खानविलकरने मानले आभार, म्हणाली…

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात सतत शाब्दिक चकमक आणि टोमणे मारणे, टीका टीपण्णी सुरुच असते. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी होते आणि एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्यात हे शाब्दिक वाद सुरु झाले. अशातच किचन कल्लाकारमध्ये एका खेळा दरम्यान, एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवला. यावेळी फोटो बघून गाणं गायला सांगितलं असता. ‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है’ हे गाणं गाताता. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक हसू लागतात.

Story img Loader