देशात एकात्मता, बंधुभाव कायम राहणे; प्रगतीबरोबर निकोप समाज निर्मितीच्या दृष्टीनेही नेहमीच महत्त्वाचे ठरते. पण अलीकडे देशात जातीमध्ये, धर्मांमध्ये तेढ वाढते असून समाजात कोणत्याही गोष्टीचे राजकारण करण्याकडेच कल दिसून येतो. त्यामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच तीव्र होतात. याच पार्श्वभूमीवर खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखीत करणारा ‘एकता एक पॉवर’ हा मराठी चित्रपट ६ जून ला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ‘राहुल इंटरप्रायजेस’ प्रस्तुत, ‘अश्विनी राहुल इंटरप्रायजेस’ चित्रपट निर्मिती संस्थेच्या अश्विनी सिरसाट निर्मित ‘एकता एक पॉवर’ चित्रपटाचे दिग्दर्शन के. विलास यांनी केले आहे.  
धर्म, भाषा, रितीरिवाज यापलीकडे माणूसकी आणि त्याच्या एकीचे बळ नेहमीच श्रेष्ठ आहे. सामाजिक एकात्मतेचे महत्त्व सांगणारी कथा ‘एकता एक पॉवर’ चित्रपटातून रेखाटण्यात आली असून यात राजेश शृंगारपुरे, स्मिता शेवाळे, मौसमी तोंडवळकर, विद्याधर जोशी, श्रीकांत शिंदे, श्याम ठोंबरे, श्रद्धा सागांवकर, अनुप चौधरी, स्नेहल कांबळे या कलाकारांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक के. विलास यांनीच चित्रपटाचे लेखन केले असून संवाद ज्ञानेश्वर आंगणे यांनी लिहिले आहेत.  
विचार करून एकजुटीने केलेली कोणतीही गोष्ट नेहमीच लक्षवेधी आणि यशस्वी ठरते, मग ते देशाचे राजकारण असो वा मैदानावरचा खेळ. एकदा का मनात आणलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ‘एकता एक पॉवर’ हा चित्रपट येत्या ६ जून ला प्रेक्षकांचे मनोरंजन करायला प्रदर्शित होतोय. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ekta ek power will release on 6 june