‘गुडबाय’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘गुडबाय’चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या समोर आला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. मुंबईत मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात निर्माती एकता कपूरसह चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. तर, अमिताभ बच्चन व्हर्चुअली या सोहळ्यात सहभागी झाले.
Photos: ४१० कोटींचा ‘ब्रम्हास्त्र’! रणबीर-आलियासह बिग बींनी घेतलेल्या मानधनाचा आकडा पाहिलात का?
या सोहळ्यात एका प्रश्नाचं उत्तर देताना एकता कपूर आपल्या आई-वडिलांबद्दल बोलताना भावुक झाली. यावेळी तिला तिचे अश्रू आवरता आले नाहीत. खरं तर ‘गुडबाय’ ही एका अशा कुटुंबाची गोष्ट आहे, ज्यामध्ये कुटुंबातील महिला (नीना गुप्ता) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाचा स्वभाव आणि वेगवेगळी मतं दिसून येतात. आई गेल्यानंतर मुलं कशी वागतात, हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. या सोहळ्यात, एकता तिच्या कुटुंबाशिवाय तिचे आयुष्य काय असेल, याचा विचार करून भावुक झाली.
हेही वाचा – “मी विमानात सेक्स करण्याचा…”; करण जोहरचा चॅट शोमध्ये खुलासा
एकता म्हणाली, “सर्वात कठीण दिवस तो असतो जेव्हा तुम्हाला जन्म देणारे तुमच्यासोबत नसतात. तो दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक दिवस येतो. त्या भीतीने लोक कसे जगतात हेच मला कळत नाही. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे, कारण हा चित्रपट एका कुटुंबाबद्दल आहे आणि आम्ही आमच्या कुटुंबाशिवाय काहीच नाही.”
दरम्यान, ‘गुडबाय’ या चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षी सुरू झाले होते. या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेसचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यातल्या काही फोटोंमध्ये बिग बी सेटवर पाळीव प्राण्यांसोबत खेळताना दिसले होते. त्यामुळे या चित्रपटाची सर्वजण खूप वाट बघत होते. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांच्याशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता आणि पावेल गुलाटी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या ७ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.