निर्माती एकता कपूरच्या आगामी गे प्रेमपटाचा दिग्दर्शक दानिश असलम असणार आहे. दानिशने ‘ब्रेक के बाद’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. शेक्सपिअरच्या कथानकावर आधारीत या चित्रपटाला गे प्रेमकथेचा रंग भरण्यात आला आहे. दानिशच्या मते, आपल्याकडे या विषयावरचा चित्रपट बनवताना त्याला अतिशय विनोदी अथवा गंभीर बनवत समलिंगी संबंधांबाबत अतिशय टोकाची भूमिका घेतली जाते. परंतु हा चित्रपट अतिशय वास्तववादी असतानाच तो नाट्यमय नसणार आहे. चित्रपटाच्या कलाकारांची निवड होणे अजून प्रतिक्षेत आहे.

Story img Loader