संजय दत्तच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. चित्रपट निर्माती एकता कपूरने संजय दत्तला एका चित्रपटासाठी दिलेल्या दीड कोटी रकमेपोटी कोर्टात खेचले आहे.
याआधी एकता कपूरने संजय दत्तची पत्नी मान्यताशी संपर्क करुन आपले पैसे परत देण्याची मागणी केली होती परंतु, मान्यताने एकताच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे एकता कपूरने अखेर कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला. २००८ साली एकता कपूर आणि अभिनेता सुनील शेट्टी मिळून एका चित्रपटाची निर्मिती करणार होते. यामध्ये अभिनेता संजय दत्तला मुख्य भूमिकेसाठी निश्चित करण्यात आले होते. तसेच सुनील शेट्टीच्या सांगण्यावरून संजय दत्तला आगाऊ दीड कोटी रक्कम दिल्याचा दावा एकता कपूरने केला आहे.
आर्थिक व्यवहाराप्रकरणी एकता कपूरने संजय दत्तला कोर्टात खेचले
संजय दत्तच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. चित्रपट निर्माती एकता कपूरने संजय दत्तला एका चित्रपटासाठी दिलेल्या दीड कोटी रकमेपोटी कोर्टात खेचले आहे.
First published on: 07-11-2014 at 07:21 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ekta kapoor takes sanjay dutt to court over rs 1 5 cores