देशात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अभिनेता जॉन अब्राहम पाठोपाठ आता एकता कपूरला करोनाची लागण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. ‘सर्व काळजी घेतल्यानंतरही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्बेत ठिक आहे आणि माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करते की त्यांनी करोना चाचणी करुन घ्या’ या आशायची पोस्ट शेअर केली आहे. एकताने स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे.
आणखी वाचा : अभिनेता जॉन अब्राहम आणि पत्नी प्रिया रुंचालची करोना चाचणी पॉझिटिव्ह

एकता कपूर पूर्वी करीना कपूर खान, अमृता अरोरा, अर्जुन कपूर, अंशुला कपूर, रिया कपूर, करण बुलानी, मृणार ठाकूर, जॉन अब्राहम आणि इतर काही कलाकारांच्या करोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यानंतर आता एकता कपूरची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

राज्यात करोना संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला असून, याचबरोबर आता ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येतही दररोज वाढ सुरू झाली आहे. २ जानेवारी रोजी दिवसभरात राज्यात ११ हजार ८७७ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली असून, ५० ओमायक्रॉन बाधितही आढळले आहेत. याशिवाय ९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे ही निश्चितच चिंताजनक बाब म्हणावी लागणार आहे. राज्य सरकार देखील आता निर्बंध अधिकच कठोर करत असल्याचे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ekta kapoor tests positive for covid 19 avb