निर्माती एकता कपूरच्या आगामी चित्रपट ‘XXX’ साठी मॉडेल क्यारा दत्तची निवड झाल्यानंतर आता आणखी तीन नवोदितांना एकताने करारबद्ध केले आहे. चित्रपटासाठी करारबद्ध होण्याआधी एकता कपूरने घातलेला ‘न्यूडिटी क्लॉज’ देखील या चौघींनी मान्य केला आहे. यातील क्यारा दत्त हिने याआधीच हा क्लॉज स्विकारला होता. आता अपर्णा वाजपेयी, प्य्रांका तालुकदार आणि अपर्णा शर्मा यांनीही एकताची अट स्विकारून करार मान्य केला आहे.
यातील अपर्णा वाजपेयी हिने दाक्षिणात्य चित्रपटांत याआधी काम केले असून तमीळ चित्रपट ‘एहसान’मधील भूमिकेने ती प्रसिद्धच्या झोतात आली. प्र्यांका तालुकदार कोलकाताची मॉडेल आहे. तर, अपर्णा शर्मा देखील मॉडेल असून ती ‘मिस इंडिया’ची स्पर्धक राहिली आहे.
बोल्ड दृश्यांचा समावेश असल्याने एकताने कलाकारांशी करार करताना त्यामध्ये ‘न्युडिटी’च्या कलमाचा समावेश करण्याचे ठरवले होते. संबंधित कलाकाराने ऐनवेळी चित्रपटातील दृश्यांवर किंवा संवादांवर आक्षेप घेत काढता पाय घेऊ नये किंवा त्यामुळे चित्रीकरणादरम्यान कोणतीही तडजोड करायला लागू नये, यासाठी एकता कपूरने अशाप्रकारचा करार करण्याचे ठरविले. एकताच्या या धाडसीपणाला वादाचा रंग चढण्याची देखील चिन्हे आहेत. या चित्रपटात एकुण पाच कथांचा समावेश असून या माध्यमातून शृंगाराचे विविध पैलू उलगडून दाखविण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे.
एकता कपूरचा ‘न्यूडिटी क्लॉज’ स्विकारून आणखी तीन अभिनेत्री ‘XXX’साठी करारबद्ध
निर्माती एकता कपूरच्या आगामी चित्रपट 'XXX' साठी मॉडेल क्यारा दत्तची निवड झाल्यानंतर आता आणखी तीन नवोदितांना एकताने करारबद्ध केले आहे.
आणखी वाचा
First published on: 28-04-2015 at 06:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ekta kapoor xxx has three more newcomers after kyra dutt