टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी ट्विटर ही जगप्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी विकत घेतली आहे. ट्विटरमधील १०० टक्के भागीदारी मस्क यांनी खरेदी केली आहे. मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रतिसमभागाप्रमाणे ४४ अब्ज डॉलरला सौदा निश्चित केला आहे. मस्क यांच्या या अब्जावधीच्या खरेदीवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध गोष्टींवर प्रतिक्रिया देताना दिसतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठीही एक खास ट्विट केले होते. दीपिकानेही यावर विशेष प्रतिक्रिया दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इलॉन मस्क यांनी काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाबद्दल एक ट्विट केले होते. यावेळी इलॉन यांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या मल्हारी गाण्याचे एक GIF शेअर केले आहे. त्यासोबत त्यांनी दीवानी मस्तानी या गाण्याची युट्यूब लिंकही शेअर केली होती. या ट्विटला कॅप्शन देताना इलॉनने ‘बाजीराव मस्तानी’ असे लिहिले आहे. त्यासोबत त्याने हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

इलॉन यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते. त्यावेळी अनेकांनी इलॉन हे बॉलिवूड चित्रपटांचे चाहते आहेत. त्यांना हे चित्रपट पाहण्यास आवडतात, असा अंदाज लावला होता. तर काहींनी त्यावर विविध कमेंटही केल्या होत्या.

विशेष म्हणजे इलॉन यांची या पोस्टवर दीपिका आणि रणवीर या दोघांनी प्रतिक्रिया दिली होती. यावेळी रणवीरने इलॉनचे ट्विट लाइक केले होते. तर दीपिकाने इलॉन यांचे हे ट्विट रिट्विट केले होते. त्यासोबत तिने दोन्हीही हात जोडलेले इमोजीही शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत.

इलॉन मस्क यांचे हे ट्विट त्याकाळी चर्चेचा विषय ठरले होते. बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी त्यांचे ट्विट प्रचंड चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. यात दीपिका पदुकोणने मस्तानी, प्रियांका चोप्राने काशीबाई आणि रणवीरने बाजीराव पेशव्यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk tweeted about sanjay leela bhansali bajirao mastani deepika padukone ranveer singh comment nrp