नोएडा येथील एका रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याच्या प्रकरणात बिग बॉस ओटीटी सीझन-२ विजेता एल्विश यादव वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नोएडा पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर एल्विश यादव मध्यरात्री नोएडा पोलीस ठाण्यात दाखल झाला. यावेळी नोएडा पोलिसांनी एका पार्टीत सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणात एल्विश यादवची दोन तास चौकशी केली.
या घटनेनंतर ‘डेटबाजी’ फेम अभिनेता फैजान अन्सारी याने एल्विश यादववर गंभीर आरोप केले आहेत. एल्विश यादव हा ड्रग्ज डिलर (अमली पदार्थांची तस्करी करणारा व्यक्ती) असल्याचा आरोप करत फैजान अन्सारीने एल्विशविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. शिवाय, एल्विश यादवची मैत्रिण आणि बिग बॉस शोमधील सह-स्पर्धक मनीषा राणीच्या फोनची तपासणी करावी. तिच्या फोनमध्ये एल्विशविरोधात पुरावा सापडेल, असा दावाही फैजान अन्सारीने केला.
हेही वाचा- Video जेव्हा रेखा यांनी व्यक्त केलेली महिलेशी लग्न करण्याची इच्छा, म्हणालेल्या, “मी…”
फैजान अन्सारीने एल्विश यादव आणि मनीषा राणी या दोघांविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, त्याने दावा केला की, “मनिषाचा फोन ताब्यात घेण्यात यावा. कारण त्यात एल्विशला तुरुंगात धाडण्यासाठी आवश्यक असलेले सर्व पुरावे आहेत.”