जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्या वेदनादायक दृश्याचे सर्व व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला व्हिडिओ म्हणजे त्या जोडप्याचा आहे. जे लग्नाच्या ६ दिवसानंतर हनिमूनला गेले होते.. त्यामधील तरुणाला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून मारले. त्या मुलीचे नाव हिमांशी आहे. तिच्या पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेला तिचा फोटो व्हायरल होत आहे. आता एल्विश यादवने सांगितले आहे की, ती त्याची मैत्रीण आहे आणि त्यालाही खूप नंतर कळले की, घटनेत मारला गेलेला तो तरुण एल्विशच्या मैत्रिणीचा नवरा होता.
एल्विश त्याच्या व्लॉगमध्ये याबद्दल बोलला आहे. तो त्याच्या व्लॉगमध्ये म्हणाला, “मी तो व्हिडीओ पाहिला, ज्यामध्ये आमचा भाऊ जो नेव्हीमध्ये होता… त्यामध्ये त्याची पत्नी म्हणत होती की, आम्ही तेथे पाणीपुरी खात होतो आणि अचानक हल्ला झाला. मी तो व्हिडीओ पाहिला, मी तो व्हिडीओ फार काळजीपूर्वक पाहिला नाही, मी फक्त काय झाले आणि काय नाही हे पाहण्यासाठी आवाज ऐकत होतो. त्यानंतर जेव्हा मी तो व्हिडीओ नीट पाहिला तेव्हा मी म्हणालो की, मी हा चेहरा कुठेतरी पाहिला आहे, तो मला खूप ओळखीचा चेहरा वाटला.”
हिमांशी आणि एल्विश एकत्र शिकायचे…
एल्विशने त्याच्या व्लॉगमध्ये पुढे म्हटले आहे, “मला आठवले की, ती माझी क्लासमेट होती. आम्ही हंसराज कॉलेजमध्ये एकत्र शिकायचो. तिचा इकॉनॉमिक ऑनर्स कोर्स होता. हिमांशी माझ्या शेजारच्या वर्गात शिकायची. मला मोठा धक्का बसला, मी काय पाहिले? हिमांशी आणि मी एकत्र शिकलो आहोत. आम्ही शेवटचे २०१८ मध्ये बोललो होतो. ती माझ्या शहरातील गुडगावची आहे. आम्ही एकत्र मेट्रोने प्रवास करायचो, खूप मजा करायचो.”
एल्विश पुढे म्हणाला, “माझ्याकडे तिचा नंबर असला तरी मी तिला फोन केला नाही. मी कॉलेजमधील एका मैत्रिणीला, दीपांशीला फोन केला. मी तिला फोन करून मी एल्विश आहे, असे सांगताच, ती, “हो, ती हिमांशी आहे”, असे म्हणाली. ती हिमांशी आहे, असे म्हणाली तेव्हा मला कसे वाटले ते मी सांगू शकत नाही.”
एल्विशने सांगितले की त्याच्या मैत्रिणीने त्याला हिमांशीशी काय बोलणं झालं आणि काय घडले ते सांगितले. एल्विश म्हणाला की, जे लोक म्हणत आहेत की त्यांनी धर्माबद्दल विचारले नाही, तुम्ही लोक हिंदू आणि मुस्लिमांबद्दल बोलत आहात. जेव्हा त्यानं विचारलं की, हे खरोखर घडलं आहे का, तेव्हा त्याच्या मैत्रिणीनं त्याला सर्व काही सांगितलं.
एल्विश म्हणाला, “तिनं सांगितलं की तिला ३० वेळा फोन केला आणि ३१ व्या वेळी तिनं फोन उचलला आणि दीपांशीनं तिला विचारलं की, ती काश्मीरमध्ये आहे का आणि ती मोठ्यानं रडू लागली आणि ते कन्फर्म झालं. तिनं विचारलं की, काय झालं हिमांशी? हिमांशीनं सर्व गोष्टी सांगितल्या. त्यांनी धर्माबद्दल विचारलं, धर्माबद्दल विचारल्यानंतर मारण्याची गोष्ट पूर्णपणे खरी आहे.” असे ती म्हणाली. पहलगाम हल्ल्याचा सर्वजण निषेध करत आहेत. शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा यांच्यासह अनेक कलाकारांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.