Emergency Movie Cuts by CBFC Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत दिग्दर्शित आणि सहनिर्मित इमर्जन्सी या चित्रपटातील काही दृश्यांना कात्री लावल्यास चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवण्यास हरकत नाही, अशी भूमिका सेन्सॉर मंडळाने (सीबीएफसी) गुरूवारी उच्च न्यायालयात मांडली. चित्रपटाच्या निर्मात्यांनी केलेल्या विनंतीनंतर न्यायालयाने त्यांना सेन्सॉर मंडळाच्या भूमिकेवर म्हणणे मांडण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ दिला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने इमर्जन्सी चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, या चित्रपटातील काही प्रसंगांना कात्री लावण्यास सांगितलं आहे.

चित्रपटातील काही दृश्य आणि संवादाना शिरोमणी अकाली दलासह शीख संघटनांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटात समाजाचे चुकीचे चित्रण केल्याचा आणि तथ्ये चुकीच्या पद्धतीने दाखविल्याचा आरोप करून संघटनेने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या न्यायालयाने शीख समुदायाचे म्हणणे ऐकण्याचे आदेश सेन्सॉर मंडळाला दिले होते. या पार्श्वभूमीवर सेन्सॉर मंडळाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रमाणपत्र देणे टाळले होते. त्यामुळे, प्रदर्शन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता टप्प्याटप्प्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होऊ लागला आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
cid aahat serials in marathi
‘सीआयडी’ आणि ‘आहट’ मालिकांचा थरार आता मराठीत; कधी आणि कुठे बघाल या मालिका, जाणून घ्या…

हे ही वाचा >> “मी सारा व इब्राहिमची आई…”, करीना कपूरचं वक्तव्य; सैफ चारही मुलांसाठी कसा वेळ काढतो? म्हणाली…

सीबीएफसीने सुचवलेले बदल

  • चित्रपटात एक प्रसंग आहे, ज्यामध्ये काही शीख एका बससमोर शिखेतरांवर गोळीबार करत आहेत, हे दृष्य चित्रपटातून काढून टाकण्यास सांगितलं आहे. तसेच वेगळ्या खलिस्तानची मागणी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या जर्नेलसिंग भिंद्रनवाले याच्याशी संबधित संवाद काढून टाकण्यास सांगितलं आहे.
  • सीबीएफसीने सांगितलं आहे की “चित्रपटाच्या सुरुवातीला हा चित्रपट सत्य घटनांपासून प्रेरित असून हे त्याचं नाटकीय रुपांतर आहे असं डिस्क्लेमर द्या. चित्रपटात दाखवलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण सत्य म्हणून पाहू नये,असंही त्यात लिहा”. नाव व ओळख स्पष्ट न करण्याच्या अटीवर एका व्यक्तीने इंडियन एक्सप्रेसला सांगितलं.
  • चित्रपटाच्या पहिल्या १० मिनिटातील एका दृश्यात भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणतायत की चीनने आसामला भारतापासून वेगळं केलं आहे. यावर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. तसेच त्यांनी निर्मात्यांना सांगितलं आहे की या माहितीचा खरा स्त्रोत जाहीर करावा. सीबीएफसीने नियुक्त केलेल्या इतिहासकारांच्या समितीने असं काही घडलं नव्हतं असं म्हटलं आहे.
  • चित्रपटाच्या ११२ व्या मिनिटाला भिंद्रनवाले सजय गांधींना म्हणतो की ‘त्वाडी पार्टी नू वोट चाइदे ने, ते सानू चैंडये खलिस्तान’ (तुमच्या पक्षाला मतं हवीत ना? मग आम्हाला खलिस्तान हवा आहे). हा प्रसंग देखील काढून टाकण्यास सांगितलं आहे. कारण या प्रसंगावेळी भंडरावाले संजय गांधींबरोबर करार करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा प्रसंग चित्रपटात ठेवायचा असल्यास सीबीएफसीने त्याचे ऐतिहासिक पुरावे सादर करण्यास सांगितलं आहे.
  • चित्रपटात संत शब्द व भिंद्रनवालेचं नाव हटवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सूत्रांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की भिंद्रनवाले याला संत म्हणणं चुकीचं आहे असं अनेक समुदायांचं म्हणणं आहे.
  • शिखांचे काही गट गैर-शिंखांच्या हत्या करत असल्याची काही दृश्ये चित्रपटात आहेत. त्यापैकी काही हिंसक दृश्यांना कात्री लावण्यास सांगितलं आहे.
  • चित्रपटाच्या १३२ व्या मिनिटाला पंतप्रधान इंदिरा गांधी व भारताचे लष्करप्रमुख सॅम मानेकशॉ हे दोघे ऑपरेशन ब्लू स्टारवर चर्चा करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यात म्हटलं आहे की ही मोहीम ‘अर्जुन दिनी’ होणार होती. हा गुरू अर्जन यांचा स्मृतीदिन आहे. सीबीएफसीने ‘अर्जुन दिना’चा उल्लेख टाळण्यास सांगितलं आहे.
  • चित्रपटात जिथे जिथे वास्तविक फूटेज वापरण्यात आलं आहे तिथे विशेष संदेश असायला हवा.
  • बोर्डाने निर्मात्यांना आदेश दिला आहे की चित्रपटात उल्लेख केलेल्या संख्या, वक्तव्ये व त्यांचे संदर्भ स्पष्ट करणारी माहिती, दस्तावेज व पुरावे सादर करावेत.