९० च्या दशकातील प्रसिद्ध चित्रपट ‘दिल है की मानता नहीं’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अभिनेता इमरान हाश्मी सुपरस्टार आमिर खानची भूमिका साकारणार आहे.
१९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते, ज्यात त्यांची मुलगी पूजा भट्ट आणि आमिर खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. महेश ‘दिल है की मानता नहीं’ या चित्रपटाचा रिमेक बनवत असून, यात इमरान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या रिमेकची कथा मूळ चित्रपटावर आधारित असल्याचे सांगितले जात असले, तरी चित्रपटाच्या दिग्दर्शकाकडून याबाबतचा अंतिम निर्णय अजून घेण्यात आलेला नाही.
महेश भट्ट म्हणाले, माझा हा चित्रपट फ्रॅंक काप्रा यांचा ‘इट हॅपन्ड वन नाईट’ या चित्रपटावर आधारित होता. ज्यात अभिनेत्याच्या व्यक्तिरेखेला न्याय दिला गेला नव्हता. रिमेकमध्ये आम्ही अभिनेत्याच्या व्यक्तिरेखेबरोबर न्याय करू इच्छितो. उल्लेखनीय बाब म्हणजे मागील वर्षी पूजा भट्टने आलिया आणि रणबीरबरोबर ‘दिल है कि मानता नहीं’ या चित्रपटाचा रिमेक करण्याची इच्छा दर्शवली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emraan hashmi steps into aamir khans shoes with dil hai ki manta nahin remake