बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक महेश भट्ट आणि त्यांचा भाऊ मुकेश भट्ट यांनी आता पर्यंत अनेक नवीन चेहरे बॉलिवूडला दिले आहेत. गायक असो किंवा कलाकार त्यांनी सगळ्या क्षेत्रात बऱ्याच लोकांना बॉलिवूडमध्ये स्थान मिळवून दिले आहे. त्यापैकी एक म्हणजे बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता इमरान हाशमी. दरम्यान, भट्ट भावंडांमध्ये सगळ्या गोष्टी या पहिल्यासारख्या राहिल्या नाहीत यावर खुलासा इमरानने एका मुलाखतीत केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इमरानने नुकतीच ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. यावेळी दोघे भावडं वेगळे का झाले याच कारण इमरानला देखील माहित नसल्याच त्याने सांगितलं आहे. “माझ्याकडे विशेश फिल्म्सच्या अनेक आठवणी आहेत. माझी फक्त अशी इच्छा आहे की आम्ही सर्वांनी पुन्हा एकदा चित्रपट करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. हा विषय काय असेल हे मला माहित नाही. परंतु तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे, सगळ्या चांगल्या गोष्टी एक दिवस संपतातच. समीकरणे बदलतात. कोणतीही गोष्टी कायम स्वरुपातली नसते. आणि मी त्यांच्यात काय चालले आहे याच्याबद्दल काही माहित नसताना हे बोलतं आहे,” असं इमरान म्हणाला.

पुढे इमरान म्हणाला, मी अजूनही त्या दोघांशी बोलतो. मुकेशजींनी ‘मुंबई सागा’ प्रदर्शित होण्याआधी मला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मी महेश भट्ट यांच्या संपर्कात आहे.

आणखी वाचा : करीनाच्या दुसऱ्या मुलाला सोशल मीडियावर गरजेपेक्षा जास्त महत्व दिले जाते- आदर्श गौरव

पुढे तो म्हणाला, “या सगळ्या गोष्टी कुठुन येतात हे मला माहित नाही. लॉकडाऊनमध्ये आम्ही सगळे आपल्या स्वत:च्या आयुष्यात व्यस्त होतो मात्र, तरीही आम्ही संपर्कात होतो. आम्ही एक कुटुंब आहोत. लॉकडाऊन दरम्यान मी भट्ट साब म्हणजेच महेश भट्ट यांच्याशी बोललो, माझ्यासाठी ते फक्त चित्रपट निर्माते नाही तर मला मार्गदर्शन करणारे आहेत. लॉकडाऊन दरम्यान गोष्टी गोंधळल्या होत्या आणि मला त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी जाणून घेण आवश्यक होतं.”

इमरानचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तर लॉकडाऊनमुळे ‘चेहरे’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ही पुढे ढकलण्यात आली आहे.