नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘घनचक्कर’ चित्रपटानंतर इमरान हाश्मी डिस्नी-यूटीव्हीच्या ‘शातीर’ या आगामी चित्रपटात काम करणार आहे. परेश रावलसुद्धा चित्रपटात मुख्य भूमिका असून नायिकेची निवड अद्याप करण्यात आलेली नाही. ‘जन्नत’ चित्रपटाचा दिग्दर्शक कुणाल देशमुख ‘शातीर’चे दिग्दर्शन करणार आहे.
‘शातीर’ या शीर्षकाचे अधिकार यापूर्वी अष्टविनायक फिल्म्सने घेतलेले होते. मात्र, डिस्नी-यूटीव्हीला हे शीर्षक मिळवून देण्यास रोहित शेट्टीने मदत केली. त्याने अष्टविनायक फिल्मससोबत चर्चा करून ‘शातीर’ शीर्षकाचे अधिकार डिस्नी-यूटीव्हीला मिळवून दिल्याचे, डिस्नी-यूटीव्हीचे क्रिएटिव्ह संचालक मनिष हरिप्रसाद यांनी सांगितले.
रोहित शेट्टीच्या आगामी ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाची निर्मिती डिस्नी-यूटीव्हीने केली आहे.

Story img Loader